मुंबई : पदवी परीक्षांचे सर्व निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने हायकोर्टाला दिलेली ६ संप्टेंबरची डेडलाईन आज संपते आहे. पण अद्याप विविध १४ परीक्षांचे निकाल जाहीर होणं प्रलंबित आहे. शिवाय, हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.
शेकडो विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकालात गैरहजर दाखवण्यात आलं आहे. इतकच काय तर टॉपर्स विद्यार्थ्यांना नापास करण्यात आल्याचीही अनेक उदाहरणे समोर येत आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठ निकाल जाहीर करण्यासाठी आणखी किती दिवस लावणावर असा प्रश्न विचारला जातो आहे. विद्यार्थ्यांमधला संताप वाढत चालला आहे. शेकडो विद्यार्थ्यांच्या पोस्ट ग्रॅज्यूएशनच्या संधी हुकल्या. अशात विद्यार्थ्यांचं अतोनात नुकसान होतं आहे. पण राज्य सरकार आणि कुलपती काय दिलासा देणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागलं आहे.