'बेबी बंप'सह बॉलिवूड अभिनेत्रीचं टॉपलेस फोटोशूट

नेटकऱ्यांच्या अशा काही प्रतिक्रिया आल्या की...  

Updated: Aug 8, 2019, 01:45 PM IST
'बेबी बंप'सह बॉलिवूड अभिनेत्रीचं टॉपलेस फोटोशूट title=

मुंबई : मॉडेलिंगपासून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या अभिनेत्री एमी जॅक्सन हिने काही दिवसांपूर्वी तिच्या गरोदरपणाविषयीची माहिती देत अनेकांनाच थक्क केलं होतं. मॉडेलिंगपासून हिंदी कलाविश्वात आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या एमीने फार कमी वेळातच आपली अशी वेगळी ओळख प्रस्थापित केली. 

सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधीही तिला मिळाली. अशी ही एमी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. आपल्या खासगी आयुष्यातील काही खास क्षण ती या माध्यमातून सर्वांपर्यंतच पोहोचवत असते. सध्याच्या घडीला इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेला तिचा असाच एक फोटो सर्वांचं लक्ष वेधत आहे. ज्या फोटोमध्ये एमीचं बेबी बंपही दिसत आहे. 

 
 
 
 

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

बेबीमूनसाठी गेलेल्या एमीचा हा टॉपलेस फोटो अनेकांची दाद मिळवून गेला. वाढलेलं वजन, त्वचेवर असणारे वळ आणि एकंदरच संपूर्ण शरीरात झालेले बदल आपण अतिशय सकारात्मकपणे घेत असून, ३३ आठवड्यांच्या गरोदरपणात आपण किती आनंदी आहोत याचं सुरेख वर्णन  तिने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. मुख्य म्हणजे हा फोटो पोस्ट केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये अनेकांनीच एमीच्या या रुपाची स्तुती केली आहे. ती या रुपातही किती सुंदर दिसत आहे, असं म्हणज तिची आणि बाळाची प्रकृती उत्तम राहो अशा सदिच्छा तिला अनेकांनी दिल्या आहेत.