'83' Trailer release: 'जितेगा जितेगा इंडिया जितेगा...'

'83' सिनेमाचा अफलातून ट्रेलर   

Updated: Nov 30, 2021, 11:10 AM IST
'83' Trailer release: 'जितेगा जितेगा इंडिया जितेगा...'

मुंबई : क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. अभिनेता रणवीर सिंग स्टारर '83' सिनेमाचा ट्रेलर  प्रदर्शित करण्यात आला. क्रिकेट विश्वातील भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारलेला सिनेमा 24 डिसेंबर रोजी रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमाचीचं चर्चा आहे. सिनेमाची कथा 1983 साली टीम इंडियाच्या विश्वचषक विजयावर आधारित आहे. 

1983 साली, महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला. सिनेमात अभिनेता रणवीर सिंगने माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेला न्याय दिलं आहे. रणवीरने हुबेहूब कपिल देव यांना रूपेरी पडद्यावर उभं केलं आहे. शिवाय दीपिकाच्या कामाचं कौतुक होत आहे.

याआधी 2021 संपण्यापूर्वी रणवीर सिंगने सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. कपिल देव यांच्या जीवनावर आधारित सिनेमी हिंदी, तमिळ, कन्नड, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

ट्रेलरची पाहिल्यानंतर ऐतिहासिक विजयाच्या आठवणी ताज्या होत आहेत. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त, सिनेमात ताहिर राज भसीन, साकिब सलीम, एमी विर्क आणि पंकज त्रिपाठी यांची देखील महत्त्वाची भूमिका आहे.