स‍िक्‍युरि‍टी गार्डच्या वागणुकीवर साराला चक्क मागावी लागली माफी

सिक्युरि‍टी गार्डने असं काय केलं, ज्यामुळे सारालाचं माफी मागावी लागली   

Updated: Nov 30, 2021, 10:41 AM IST
स‍िक्‍युरि‍टी गार्डच्या वागणुकीवर साराला चक्क मागावी लागली माफी

मुंबई : अभिनेता सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा असो किंवा अभिनेता शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी असो, बॉलीवूड स्टार्सचे स‍िक्‍युरि‍टी गार्ड नेहमीच चर्चेत असतात. मात्र सोमवारी सारा अली खानच्या स‍िक्‍युरि‍टी गार्डने असे कृत्य केले की, त्याबद्दल सारालाच माफी मागावी लागली. साराने सर्वांसमोर माफी मागणे तिच्या चाहत्यांना आवडले असून तिचं सोशल मीडियावर कौतुकही होत आहे. 

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही सध्या तुफान व्हायरल होत आहे. सोमवारी साराने तिच्या आगामी 'अतरंगी रे' या सिनेमातील 'चका चक' या पहिल्या गाण्याच्या लाँचिंगला हजेरी लावली. या गाण्यात सारा जबरदस्त स्टाइलमध्ये साडी नेसून डान्स करताना दिसत आहे. 

कार्यक्रम संपल्यानंतर सारा गाडी जवळ गेली. तेव्हा साराला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी फोटोग्राफर्सची एकचं गर्दी जमली. तेव्हा साराच्या स‍िक्‍युरि‍टी गार्ड एका फोटोग्राफरला धक्का मारला. त्यानंतर सारा चिडली आणि या प्रकरणानंतर खुद्द साराने जमलेल्या सर्व फोटोग्राफर्सची माफी मागितली. साराच्या अशा स्वभावाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सारा मागे वळून तिच्या स‍िक्‍युरि‍टी गार्डला समजावते, 'तुम्ही कृपया कोणालाही धक्का देऊ नका, कृपया असे करू नका.' यानंतर साराने गार्डच्या वतीने सर्वांची माफी मागितली.