2020 मध्ये 'या' तीन अभिनेत्रीचं बॉलिवूडमध्ये Come Back

90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री 

Updated: Dec 11, 2019, 10:48 AM IST
2020 मध्ये 'या' तीन अभिनेत्रीचं बॉलिवूडमध्ये Come Back

मुंबई : बॉलिवूडमध्ये एकदा ब्रेक लागल्यावर पुन्हा पदार्पण करणं हे जरा कठीणच असतं. मोठ्या पडद्यावरून दूर गेल्यावर प्रेक्षकही त्या कलाकाराला विसरतात; असं असतानाही एकेकाळी स्वप्नसुंदरी राहिलेली अभिनेत्री तब्बल 10 वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. अभिनेत्रीने याचा खुलासा स्वतः इंस्टाग्रामवर केला आहे. 

अभिनेत्री सुष्मिता सेननं इन्स्टाग्रामवरुन एका मोठ्या गोष्टीचा खुलासा केला आहे. सुष्मिता तब्बल १० वर्षानंतर पुन्हा एकदा बिग स्क्रीनवर पदार्पण करतेय. स्वतः सुष्मिता सेननं या बाबातची माहिती दिली आहे. या पोस्टसोबत तिने एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यामुळे तिच्या कमबॅकबद्दल अनेकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

सुष्मिता सेन या अगोदर 2010 मध्ये "नो प्रॉब्लेम' सिनेमात दिसली होती. हा सिनेमा अनीस बझ्मीने दिग्दर्शित केला होता. अनिल कपूर, संजय दत्त, कंगना राणावत आणि अक्षय खन्ना या सिनेमात लीड रोल साकारत होते. यानंतर ती बॉलिवूडमध्ये दिसली नाही. 

2015 मध्ये सुष्मिताने 'निर्बाक' या बंगाली सिनेमात काम केलं होतं. या सिनेमाचं दिग्दर्शन श्रीजीत मुखर्जींनी केलं होतं. आता फक्त सुष्मिताने बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याचं म्हटलंय. पण हा सिनेमा कोणता आणि कधी येणार याची काहीच माहिती मिळालेली नाही. 44 वर्षांची सुष्मिताने लग्न केलं नाही पण तिने दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. रेनी ही सुष्मिताची पहिली दत्तक मुलगी असून 2000 साली दत्तक घेतलं आहे. तर 10 वर्षांनंतर 2010 साली तिने अलीसाला दत्तक घेतलं. 

तसेच 2020 मध्ये अभिनेत्री पूजा भट्ट देखील कमबॅक करत आहेत. तब्बल 11 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पूजा दिसणार आहे. महेश भट्ट दिग्दर्शित 'सडक 2' या सिनेमात पूजा दिसणार आहे. आदित्य रॉय कपूर या सिनेमांत लीड रोलमध्ये आहे. 2009 मध्ये पूजाचा शेवटचा स्क्रीन प्रेजेंस पाहायला मिळाला होता. 'सनम तेरी कसम' या सिनेमात तिने सैफ अली खानसोबत स्क्रीन शेअर केली होती. 

2020 मध्ये कमबॅक करणारी तिसरी अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. शिल्पा साबिर खान दिग्दर्शित 'निकम्मा' सिनेमातून पुनरागमन करत आहे.

2007 मध्ये शिल्पा मोठ्या स्क्रिनवर दिसी होती. 'अपने' सिनेमांत धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबी देओल पहिल्यांदा एकत्र आले होते. त्यानंतर 2008 मध्ये दोस्ताना आणि 2014 मध्ये 'ढिश्कियाऊं' मध्ये स्पेशल डान्स करताना दिसली.