सलमान खानवर तस्लीमा नसरीनची टीका

सलमान-कतरिनाचा पंतप्रधानांसोबतचा फोटो चर्चेत 

Updated: Dec 11, 2019, 09:53 AM IST
सलमान खानवर तस्लीमा नसरीनची टीका

मुंबई : सलमान खान Salman Khan आणि कतरिना कैफ Katrina Kaif  नुकतेच बांग्लादेश टी-20 Bangladesh T-20 क्रिकेट सामन्याच्या ग्रँड ओपनिंग सोहळ्याकरता गेले होते. यावेळी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजिद Bangladesh PM Sheikh Hasina देखील उपस्थित होत्या. या सोहळ्यात दोघांनी दमदार परफॉर्मन्स दिला. त्यांच्या याच परफॉर्मन्सवर लेखिका तस्लीमा नसरीन Taslima Nasreenयांनी टीका केली आहे. 

तस्लीमा यांनी ट्विटरवर सलमान खानचा एक फोटो शेअर करून टीका केली आहे. या फोटोत सलमान खान बॅक डान्सरसोबत दिसत आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'सलमान खान, कतरिना कैफ आणि अर्धनग्न महिला रूढीवादी मुस्लिम देश असलेल्या बांग्लादेशात कामूक गाण्यांवर नृत्य सादर केलं. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या हिजाबी, बुर्केवाली, दाढीवाले मुल्ला हे पाहून अतिशय खूष होत होते. इस्लाम धर्माला पसंत नसलेल्या गोष्टी इथे केल्या जात आहेत.' 

तस्लीमांच्या या पोस्टवर काहींनी समर्थन केलं आहे तर काहींनी टीका केला आहे. एकाने कमेंट केली आहे की, बायको, बहिण, आणि मुली बुर्क्यात हव्या पण दुसऱ्यांच्या नाहीत. यासारख्या अनेक कमेंट या फोटोखाली देण्यात आल्या आहेत. (प्रदर्शनापूर्वीच सलमानचा दबंग-३ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात)

या सोहळ्यामुळे बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सलमान-कतरिना बांगलादेशच्या पंतप्रधान शेह हसीना यांच्यामुळे चर्चेत आहेत. दोघांनी अलिकडेच पंतप्रधान शेख हसिना यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो सलमानने सोशल मीडियावर शेअर केलेत. सलमान आणि कतरिनाचे हे फोटो चांगलेच व्हायरल झालेत.

सलमान-कतरिनाने बंगाबंधु बांग्लादेश प्रीमियर लीग (BBPL) च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान शेख हसीना यांच्यासोबत भेट झाली. या सोहळ्याला सलमान-कतरिनाने लाइव परफॉर्मन्स देखील केला आहे. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. यावेळी बांग्लादेशातील लोकप्रिय व्यक्ती देखील तेथे उपस्थित होत्या.  याचा ग्रँट सोहळा बांग्लादेशच्या ढाका शहरात शेर-एक-बांग्ला नॅशनल स्टेडिअममध्ये करण्यात आला. या सोहळ्यात सलमान-कतरिनाच्या परफॉर्मन्सने सगळ्यांची मन जिंकली. ('दबंग ३'मध्ये अशी लागली सई मांजरेकरची वर्णी) 

 

कामाबद्दल बोलायचं झालं तर सलमान खानचा 'दबंग 3' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यामध्ये सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर आणि सुदीप किच्चा प्रमुख भूमिकेत आहे. 20 डिसेंबर 2020 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.