पाहा कसं आहे आलिया भट्टचं सुंदर घर

आलिया भट्ट ही आता बॉलिवूडमध्ये स्टार बनली आहे. आता ती महेश भट्टची मलगी म्हणून नाही ओळखली जात. तिने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आलिया आता तिच्या आई-वडिलांपासून वेगळी राहते. आलियाने नवीन घर घेतलं आहे. बहिण शाहीन सोबत ती या घरात शिफ्ट झाली आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 16, 2017, 05:43 PM IST
पाहा कसं आहे आलिया भट्टचं सुंदर घर title=

मुंबई : आलिया भट्ट ही आता बॉलिवूडमध्ये स्टार बनली आहे. आता ती महेश भट्टची मलगी म्हणून नाही ओळखली जात. तिने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आलिया आता तिच्या आई-वडिलांपासून वेगळी राहते. आलियाने नवीन घर घेतलं आहे. बहिण शाहीन सोबत ती या घरात शिफ्ट झाली आहे.

आलिया आणि शाहीन यांनी घरात एक टी-बार बनवला आहे. कारण दोघीही शहाच्या शौकीन आहेत. आलियाचं हे घर थ्री बीएचके आहे. यंग आणि वाइब्रेंट आलियाचं घर कसं आहे हे तुम्हाला पाहायला नक्की आवडेल.

Related image

आई-वडिलांपासून वेगळी राहणारी आलिया म्हणते की, मी संपूर्ण आयुष्य आई-वडिलांसोबत नाही राहणार. मला आता स्पेसची गरज आहे. मी हा प्रयत्न केला की माझं घर हे त्यांच्या घरापासून जवळ असावं.

आलिया आणि शाहीनने घर घेण्याचा निर्णय घेतला पण यावर वडील खूश नव्हते. महेश भट्ट यांना ही गोष्ट अजिबात आवडली नव्हती. यावर आलिया म्हणते की, मी खूप प्रयत्न केला आणि शेवटी मी वडिलांचा होकार मिळवला. पण ते अजून यावर खूश नाहीत.

Image result for alia bhatt house

आलियाचं घर डायरेक्टर विकास बहल यांच्या पत्नीने डिझाईन केलं आहे. आलियाची ऋचासोबत भेट ही 'शानदार' सिनेमाच्या शुटींगदरम्यान झाली होती.

आलियाला तिचं घर अतिशय साधं हवं होतं. तिला मॉडर्न टाईप घर नको होतं.

पाहा आलियाचं सुंदर घर