बॉयफ्रन्डसोबत पहिल्या किसचा अनुभव शेअर करत अनुराग कश्यपची लेक म्हणाली...

आलियाने तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

Updated: May 21, 2021, 08:11 AM IST
बॉयफ्रन्डसोबत  पहिल्या किसचा अनुभव शेअर करत अनुराग कश्यपची लेक म्हणाली... title=

मुंबई : बॉलिवूडकरांची मुलं कायम लाईमलाईटमध्ये असतात. सध्या स्टारकिड्सची चर्चा सर्वत्र रंगत आहे. दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपची मुलगी आलिया सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. अभिनेत्री नसली तरी तिच्या चर्चा मात्र कायम रंगत असातात. सतत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणारी आलिया तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. आता देखील तिने खासगी आयुष्यातील एक किस्सा सांगितला आहे. यावेळी आलियाने तिच्या आणि शेनच्या पहिल्या किसविषयी सांगितलं आहे.

आलियाने तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने बॉयफ्रन्डसोबत  पहिल्या किसचा अनुभव शेअर केला आहे. आलिया आणि बॉयफ्रन्ड शेनची भेट एक डेटिंग ऍपच्या माध्यमातून झाली. त्यानंतर दोन महिने चॅटींग केल्यानंतर त्यांनी भेटण्याचा निर्णय घेतला. तेव्हा दोघे फक्त भेटले नाही तर त्यांनी किस पण केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aaliyah Kashyap (@aaliyahkashyap)

‘गर्ल टॉक पार्ट-2’मध्ये आलियाने तिच्या पहिल्या किसचा अनुभव सांगितला आहे. 'शेन मला भेटल्यानंतर गोंधळून गेला होता. त्याला वाटत होतं की मला आवडणार नाही. त्यानंतर बोलताबोलता मी त्याला किस केलं. शेनला किस केल्यानंतर मला फार विचित्र वाटतं होतं. 'असं आलियाने तिच्या युट्यूब व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. 

‘गर्ल टॉक पार्ट-2’मध्ये आलिया तिच्या फेन्डसोबत बोलताना दिसत आहे. आलिया तिच्या चॅनलवर कायम फॅशन, लाईफस्टायल, आणि सौंदर्याबाबत माहिती देत असते. शिवाय इन्स्टाग्रावर सतत फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात असते. सोशल मीडियावर आलियाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.