टीव्ही विश्वातील प्रसिद्ध जोडीचा अचानक घटस्फोट? काय आहे सत्य

टीव्ही विश्वातील सर्वात प्रसिद्ध जोडीचा घटस्फोट झाल्याचा दावा केला जात आहे. 

Updated: Jan 6, 2022, 08:55 PM IST
टीव्ही विश्वातील प्रसिद्ध जोडीचा अचानक घटस्फोट? काय आहे सत्य title=

मुंबई : टीव्ही विश्वातील सर्वात प्रसिद्ध जोडीचा घटस्फोट झाल्याचा दावा केला जात आहे. एका अहवालानुसार या दोघांचाही घटस्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे. आमिर अली आणि संजीदा शेख यांचा घटस्फोट झाला आहे. याची सध्या सोशल मीडियावर देखील जोरदार चर्चा रंगली आहे. हे दोघंही एकमेकांना मुव्हऑन करण्याचा सल्ला देत होते. 

टीव्हीवरील प्रसिद्ध जोडी आमिर अली आणि संजीदा शेख अखेर वेगळे झाले. बराच काळ एकमेकांपासून विभक्त राहात होते. मात्र त्यांनी कायदेशीरपद्धतीनं घटस्फोट घेतला आहे. या दोघांचं 2 मार्च 2012 मध्ये लग्न झालं होतं. लग्नाची 9 वर्ष चांगली सरली म्हणता म्हणता जानेवारी 2020 मध्ये एक बातमी आली. या बातमीमुळे चर्चा तर रंगलीच पण चाहते नाराज झाले. 

आमिर आणि संजीदा या दोघांमध्ये सगळं काही नीट नाही असा दावा स्पॉटबॉयने जानेवारी 2020मध्ये केला होता. लवकरच दोघं वेगळे होतील असा दावा केला होता. अभिनेत्री तेव्हापासून तिच्या आईसोबत राहात होती. तिने पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. 

मुलीची कोणाला मिळाली कस्टडी? 
अहवालानुसार या दोघांचा 9 महिन्यापूर्वी घटस्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र त्यांचा आता घटस्फोट झाल्याची बातमी पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांची 2 वर्षांची मुलगी आयराची कस्टडी तिची आई संजीदाकडे देण्यात आली आहे. 

या सगळ्या चर्चांवर या दोघांनीही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. दोघेही आपापल्या आयुष्यात आनंदी आहेत. दोघंही आपल्या खाजगी आयुष्याबद्दल काहीही बोलणे सोशल मीडियावर टाळत असल्याचं दिसत आहे.

30 ऑगस्ट 2019 मध्ये संजीदा आणि आमिर डान्स रिअॅलिटी शोमध्ये एकत्र दिसले होते. या दोघांचे चाहते देखील खूप आहेत. त्यामुळे घटस्फोटाच्या या बातमीमुळे चाहते खूप नाराज झाले आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत असल्याचं सांगितलं जात आहे.