घटस्फोटानंतर आमिर आणि किरण पुन्हा एकत्र, त्यांच्यासोबत आणखी कोण आहे पाहा..

अभिनेता आमिर खान (Aamir Khan) नुकताच त्याच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आला होता.  

Updated: Jul 10, 2021, 07:03 AM IST
घटस्फोटानंतर आमिर आणि किरण पुन्हा एकत्र, त्यांच्यासोबत आणखी कोण आहे पाहा..

मुंबई : अभिनेता आमिर खान (Aamir Khan) नुकताच त्याच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे चर्चेत आला होता. घटस्फोटानंतर आमिर आपल्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला आहे आणि यावेळी त्याची एक्स पत्नी किरण राव ही देखील (Kiran Rao) त्यांच्यासोबत होती. आता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घटस्फोटानंतर आमिर किरण एकत्र  

आमिर खान आणि किरण राव यांनी लग्नाच्या 15 वर्षानंतर एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आमिर खानचे वैयक्तिक जीवन पुन्हा एकदा लोकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे. घटस्फोटाच्या घोषणेनंतर बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खान त्याच्या आगामी चित्रपट लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) याच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच हा फिल्म स्टार आपल्या चित्रपटाच्या टीमसोबत शूटिंगसाठी लडाखला रवाना झाला होता. आता फिल्मस्टार आमिर खान आणि किरण राव यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आमिर लष्कराच्या वर्दीत

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chay Akkineni (@chayakkineni)

घटस्फोटानंतर प्रथमच समोर आलेल्या फोटोमुळे आमिर खान आणि किरण राव यांच्याबाबत पुन्हा सोशल मीडियावर चर्चा झडू लागली आहे. या चित्रात आमिर खान सैन्याच्या गणवेशात दिसत आहे. तर एक्स पत्नी किरण रावदेखील त्याच्यासमवेत पोझ देताना दिसत आहेत.

नागा चैतन्यही उपस्थित

आमिर खान आणि किरण राव यांच्यासमवेत नागा चैतन्य हेही या फोटोत दिसूत आहेत. या फोटोनंतर दक्षिण चित्रपटातील अभिनेत्री सामंथा अक्किनेनी आनंद व्यक्त केला आहे. अभिनेत्रीने तातडीने पती नागा चैतन्य यांचे हे चित्र इन्स्टाग्रामवर पुन्हा पोस्ट केले. आमिर खानसमवेत नागा चैतन्यच्या या चित्रावर भाष्य करताना अभिनेत्रीने लिहिले, 'ये, ये, ये धन्यवाद.'

नागा चैतन्यचे बॉलिवूडमध्ये पदार्पण 

दरम्यान, दक्षिण सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्य आमिर खानच्या निर्मितीत तयार होत असलेल्या या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. या चित्रपटात नागा चैतन्य आमिर खानच्या मित्राची भूमिका साकारत आहे.