'जर तो मानसिकदृष्ट्या...'; सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आमिर खानच्या भावाचं धक्कादायक वक्तव्य

फैसल खानने त्याच्या कुटुंबारही गंभीर आरोप केले आहेत

Updated: Sep 16, 2022, 04:43 PM IST
'जर तो मानसिकदृष्ट्या...'; सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत आमिर खानच्या भावाचं धक्कादायक वक्तव्य title=

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) भाऊ फैसल खान (Faisal Khan) त्याच्या एका मुलाखतीमुळे (Faisal Khan Interview) चर्चेत आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील घराणेशाही, चित्रपटांवर बहिष्कार आणि सुशांत सिंग राजपूतच्या (sushant singh rajput) मृत्यूबाबत फैसल खानने भाष्य केलं आहे. 

फैसल खानने याआधी खुलासा केला होता की त्याला सलमान खानच्या (salman khan) रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये (bigg boss) आमंत्रित केलं गेले होते. पण त्याने ही ऑफर नाकारली. पण आता तो पुन्हा एकदा त्याच्या मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. 

फैसलने सांगितले की, सुशांतचा (sushant singh rajput) मृत्यू झाला नसून त्याचा खून झाला आहे. सुशांतच्या मृत्यूमध्ये अनेक त्रुटी आहेत. सत्य लवकर बाहेर यावे, अशी प्रार्थना करतो. त्याचवेळी फैसलने बॉयकॉट ट्रेण्डचेही (boycott) समर्थन केले आहे. ते म्हणाले की, चित्रपटसृष्टीचा खरा चेहरा समोर आला आहे, जो प्रेक्षकांना पचवता येत नाही.

टाईम्स नाऊ नवभारतशी संवाद साधताना फैजलने चित्रपटांवर बहिष्कार (boycott) टाकण्याचे समर्थन केले. सुशांतची हत्या झाल्याचेही त्याने म्हटलं आहे. फैसल म्हणाला, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर मला विश्वास आहे की त्याची हत्या झाली आहे. कधी, काय उघडेल आणि समोर येईल माहीत नाही. तपास यंत्रणा कामात गुंतलेल्या असतात पण कधी कधी सत्य बाहेर येत नाही. सत्य बाहेर यावे अशी मी प्रार्थना करतो. निकाल सर्वांना कळू द्या. 

इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी

फैसलने नेपोटिझमवरही (Nepotism) भाष्य केले आहे. या इंडस्ट्रीमध्ये भ्रष्टाचार, घराणेशाही असल्याचे ते म्हणाले.  नेपोटिझममधून चित्रपट मिळेल. पण जर तुमच्यात हिंमत नसेल आणि तुम्हाला काम माहित नसेल तर तुम्ही टिकू शकणार नाही. त्यातही गटबाजी असल्याचे फैसल म्हणाला. गटामध्ये नसलेल्या समस्या उद्भवतात असेही फैजलने म्हटलं आहे.

सुशांतच्या मृत्यूमध्ये नक्कीच काहीतरी गूढ

फैसल म्हणाला की, "या  इंडस्ट्रीमध्ये सगळे कट कारस्थानी लोक आहेत. हे आता उघड होत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमध्ये नक्कीच काहीतरी गूढ आहे. त्यात अनेक त्रुटी आहेत. लोक या गोष्टींवर विश्वास ठेवू शकत नाहीत. जर तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असेल तर तो एवढी चांगली कामगिरी कशी करू शकला. पण हे गूढही कधी ना कधी उकलणारच." 

सुशांत सिंह राजपूतच्या निधनाने इंडस्ट्रीची अनेक गुपिते उघडली आहेत जी लोकांच्या पचनी पडत नाहीत. ड्रग्ज प्रकरणात अनेकांची नावे आल्याने अनेकांची प्रतिमा डागाळल्याचे फैसलने सांगितले.

कौटुंबिक वादावरही भाष्य

मुलाखतीदरम्यान फैसल कौटुंबिक वादावरही मोकळेपणाने बोलताना दिसला.  आमिरसोबत 'मेला' या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, पण नंतर तो पडद्यावरून गायब झाला. फैसलच्या म्हणण्यानुसार, तो अनेक कौटुंबिक प्रकरणांमध्ये अडकला होता, ज्यामुळे त्याने स्वतःला फिल्म इंडस्ट्रीपासून दूर केले.

फैसल म्हणाला की, प्रियजनांशी भांडणे खूप कठीण असते. फैसलच्या म्हणण्यानुसार, घरच्यांनी त्यांनी वेडे ठरवलं. आमिरने सोबत सुरक्षा रक्षक बसवले. फोन हिसकावण्यात आला. जगापासून तुटल्यानंतर बंद जागेत ठेवण्यात आल. औषधेही देण्यात आली. हे सर्व बराच काळ सहन केले.

फैसलने सांगितले की, नंतर त्याने आपल्या कुटुंबाला सोडले आणि त्यांच्याविरुद्ध खटला दाखल केला, ज्यामध्ये तो जिंकला. तो वेडा नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. दुसऱ्या लग्नानंतर त्याचे वडील वेगळे राहू लागले, पण त्या काळात त्यांनी फैसलला साथ दिली. केस जिंकल्यानंतर फैसलने पटकथा लेखनाचे काम सुरू केले.