लगानमध्ये आमिर खानसोबत काम करणारी अभिनेत्री ब्रेन स्ट्रोकमुळे बेरोजगार

आमिर खानसोबत लगान चित्रपटात दिसलेल्या अभिनेत्री परवीनाने अभिनेत्याला मदतीची विनंती केली आहे.

Updated: Sep 24, 2021, 10:53 PM IST
 लगानमध्ये आमिर खानसोबत काम करणारी अभिनेत्री ब्रेन स्ट्रोकमुळे बेरोजगार

मुंबई : आमिर खानसोबत लगान चित्रपटात दिसलेल्या अभिनेत्री परवीनाने अभिनेत्याला मदतीची विनंती केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, परवीनाला गेल्या वर्षी ब्रेन स्ट्रोक झाला होता, त्यानंतर तिची प्रकृती ठीक नाही. परवीनाला कास्टिंग डायरेक्टर व्हायचं आहे आणि अलीकडेच तिने आमिर खानकडे जाहीरपणे मदत मागितली आहे. परवीनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं आहे की, 'माझ्या कुटुंबाने मला नेहमीच मदत केली आहे. काही मित्रांनीही मला यावेळी साथ दिली. मला बरं होईपर्यंत फक्त काही आर्थिक मदत हवी आहे.

परवीना पुढे म्हणाली की, 'मला कास्टिंग डायरेक्टर बनायचं आहे आणि प्रॉडक्शन हाऊसना विनंती करायची आहे की, मला काम द्या, आमिर भाईला माझ्या आजाराबद्दल अजून माहिती नाही. जर त्यांना माहिती असतं तर त्यांनी मला नक्कीच मदत केली असती. सगळ्यांना माहीत आहे की, त्याने लगानमध्ये त्याचा कोस्टार श्री वल्लभ व्यास यांनाही मदत केली. मला फक्त त्यांना सांगायचं आहे कीत, मला काम द्या. लगान चित्रपटात काम करणारे श्री वल्लभ व्यास आता आमच्यात नाहीत.

2018 मध्ये, जेव्हा वल्लभ व्यास यांच्या निधनाची बातमी कळली, तेव्हा आमिर खान त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी पुढे आला होता. ब्रेन स्ट्रोकमुळे वल्लभचा मृत्यू झाला. परवीनाच्या मते, आतापर्यंत CINTAA, अक्षय कुमार आणि सोनू सूद तिच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. जर आपण आमिर खानबद्दल बोललो तर आजकाल अभिनेता त्याच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटात व्यस्त आहे, या चित्रपटात करीना कपूर खान देखील आमिरसोबत दिसणार आहे.