चाहत्यांसोबत आमिर खेळला गरबा...

बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रविवारी बडोद्यात गेला होता.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 25, 2017, 04:52 PM IST
चाहत्यांसोबत आमिर खेळला गरबा...  title=

बडोदा : बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रविवारी बडोद्यात गेला होता. नवरात्रीचे दिवस आणि त्यात गुजरात... मग गरबा होणार नाही.. हे कसे शक्य आहे ? आमिर देखील तेथील गरब्याच्या रंगात रंगला. त्याने भक्तिभावाने दुर्गेची पूजा केली आणि चाहत्यांसोबत त्याने गरब्याचा ठेका ठरला. नंतर सेल्फी  काढण्यात तो मग्न झाला.

सध्या आमिर त्याचा आगामी सिनेमा ‘सिक्रेट सुपरस्टार’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आमिरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून बडोद्याचे कौतुक करत म्हटले की, ‘हे माझे पहिले गरबा सेलिब्रेशन आहे. या शहराचे रंग फारच अद्भूत आहेत.’

‘सिक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटात झायरा वसीम मुख्य भूमिकेत आहे. ‘दंगल’ सिनेमात झायराने आमिरसोबत काम केले होते. ‘सिक्रेट सुपरस्टार’मध्ये आमिर एका संगीतकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे.

हा एक संगीतमय चित्रपट आहे. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले असून या चित्रपटाची निर्मिती आमिर खान व किरण राव यांची आहे. ‘सिक्रेट सुपरस्टार’ यावर्षी दिवाळी दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.