'चित्रपट चालण्यासाठी हिंसा आणि सेक्स दाखवतात...', Animal च्या यशात आमिरचा तो Video Viral

Aamir Khan's old video :  आमिर खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे. कारण त्यानं चित्रपटातील हिंसा आणि सेक्स सीन्सवर वक्तव्य केलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 3, 2023, 10:54 AM IST
'चित्रपट चालण्यासाठी हिंसा आणि सेक्स दाखवतात...', Animal च्या यशात आमिरचा तो Video Viral title=
(Photo Credit : Social Media)

Aamir Khan's old video : 1 डिसेंबर रोजी रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी वर्ल्ड वाइड 100 कोटींचा आकडा पार केला होता. तर आता भारतात दोन दिवसात या चित्रपटानं 100 कोटींचा आकडा पार केला आहे. एकीकडे प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना, हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात देखील अडकला आहे. तर काही लोकांना हा चित्रपट स्त्रियांच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटात हिंसा, इंटिमसी आणि बोल्ड कॉन्टेन्टची चर्चा सुरु असताना दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात आमिर चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या या सगळ्या गोष्टींवर चर्चा करत होता.

खरंतर आमिरचा हा व्हिडीओ खूप जूना आहे. रेडिटवर आमिरचा हा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत आमिर खान बोलताना दिसतो की काही अशा भावना असतात. ज्या सहज प्रेक्षकांना भडकवतात. एक म्हणजे हिंसाचार आणि दुसरा इंटिमेट सीन्स. या दोन भावना अशा आहेत की त्या सहज कोणाला भडकवू शकतात. जे दिग्दर्शक कथा तयार करण्यात, इमोशन्स दाखवण्यात किंवा परिस्थिती निर्माण करण्यात हुशार नसतात, ते इंटिमेट सीन्स आणि हिंसाचारावर जास्त अवलंबून असतात. जर आपण जास्त हिंसाचार किंवा इंटिमेट सीन दाखवले तर आपला चित्रपट यशस्वी होईल, असे त्यांना वाटते. असे करून ते अनेक वेळा यशस्वी होण्याची शक्यता आहे. पण मला वाटते की ते समाजासाठी धोकादायक आहे आणि मला वाटते की आपण एक जबाबदार नागरीक आहोत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आमिर खान पुढे म्हणाला, चित्रपटाशी संबंध असलेल्या लोकांनी याची जबाबदारी घ्यायला हवी कारण आपले चित्रपट पाहणारे प्रेक्षक ते पाहून प्रेक्षक नक्कीच प्रभावित होतात. चित्रपट बनवताना आपण काय दाखवतोय हे लक्षात ठेवायला हवं. चित्रपटात हिंसा असायला नको असं माझे म्हणणं नाही पण ते त्या विषयावर अवलंबून आहे. जर तुम्ही एखादा विषय बनवत असाल ज्यामध्ये हिंसा दाखवणे आवश्यक असेल तर तुम्ही ते दाखवू शकता पण त्यासाठीही वेगवेगळ्या पद्धती आहेत.'

हेही वाचा : VIDEO : 'ॲनिमल' ला मिळालेलं यश पाहता बॉबी देओलला अश्रू अनावर

दरम्यान, आमिरच्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओला नेटकरी रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' शी जोडण्यात येत आहे. अनेकांनी आमिर खानची स्तुती केली आहे. खरंतर, रणबीर कपूरच्या चित्रपटात आमिर बोलत असलेल्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आहेत.