दंगलनंतर आमिर खानच्या सिक्रेट सुपरस्टारचा चीनमध्ये जलवा

'दंगल'नंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या आणखी एक सिनेमानं  चायनामध्ये आपला दबदबा कायम ठेवलाय. आमिर खानचा सिक्रेट सुपरस्टार चायनामध्ये प्रदर्शित झालाय. 

Updated: Jan 20, 2018, 01:52 PM IST
दंगलनंतर आमिर खानच्या सिक्रेट सुपरस्टारचा चीनमध्ये जलवा

मुंबई : 'दंगल'नंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या आणखी एक सिनेमानं  चायनामध्ये आपला दबदबा कायम ठेवलाय. आमिर खानचा सिक्रेट सुपरस्टार चायनामध्ये प्रदर्शित झालाय. 

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या सिनेमानं २१ कोटींचा व्यवसाय करुन, चायना बॉकिस ऑफिसवरचे अनेक रेकॉर्ड मोडलेत. या आठवड्यात चायनामध्ये प्रदर्शित होणा-या चित्रपटांच्या तुलनेत आमीरच्या सिक्रेट सुपरस्टारनं आतापर्यंत सर्वाधिक कमाई केलीये. 

जाणकारांच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत सिक्रेट सुपरस्टार  चायनामध्ये 500कोटीहून अधिक व्यवसाय करण्याची शक्यता आहे.. तसं झालं तर सिक्रेट सुपरस्टारचं भारतीय, चायना आणि वर्ल्डवाइड  बॉक्सऑफिस कलेक्शन पाहता, हा सिनेमा 2017चा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरेल.. आतापर्यंत सलमान खानचा टायगर जिंदा है 550कोटींचा बिझनेस करत 2017चा हायेस्ट बॉलिवूड ग्रॉसर ठरलाय.