कोरोनावर मात करत पुन्हा शाळेला निघाली आराध्या

तिची ही नवी शाळा आहे तरी कशी पाहा..

Updated: Aug 10, 2020, 02:34 PM IST
कोरोनावर मात करत पुन्हा शाळेला निघाली आराध्या

मुंबई : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. या कोरोना काळात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता अभिषेक बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांना कोरोनाची लागण झाली होती. पण आता बच्चन कुटुंबीय कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडले असून त्यांनी आपल्या रोजच्या कामाला देखील सुरूवात केली. शिवाय बिग बींची नात आराध्याने देखील तिच्या अभ्यास क्रमाला सुरूवात केली.

सध्या सोशल मीडियावर आराध्याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती हिंदी विषयाचा अभ्यास करताना दिसत आहे. कोरोना काळात सर्व शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण पद्धतीवर जोर दिला जात आहे. तर आराध्या देखील ऑनलाईन शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून हिंदीचे धडे गिरवताना दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Little #aaradhyabachchan from her online classes. . . #amitabhbachchan #bachchan #shehanshah #bigb #abhishekbachchan #jayabachchan #aishwaryaraibachchan #love #corona #covid19 #coronavirus #covidpositive #bollywood #breathe2 #aaradhyabachchan #hospital #jhund #ludo #movies #mumbai #india #love #bigb #aishwaryarai #bachchans #school #throwbackthursday

A post shared by Filmykiida (@filmykiida) on

व्हिडिओमध्ये आराध्याने शाळेचा गणवेश घातला असून हेयर स्टायलमुळे ती फार गोड दिसत आहे. ती हिंदीच्या पुस्तकातील काही ओळी वाचत आहे. त्यानंतर शिक्षकांना 'धन्यवाद' म्हणून आदर व्यक्त करताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी आराध्या, ऐश्वर्या, अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली. सर्वप्रथम बिग बींना कोरोनाची बाधा झाल्याची बाब समोर आली त्यानंतर अभिषेक बच्चन, ऐश्वर्या आणि आराध्याला कोरोनाची लागण झाली. नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांनी कोरोनावर मात केली आहे.