आराध्याच्या बर्थ डेला अभिषेक बच्चन आणि शाहरूख खानही रमले बालपणात!

काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांची मुलगी आराध्या हिचा सहावा बर्थ डे साजरा करण्यात आला. 

Updated: Nov 19, 2017, 03:06 PM IST
आराध्याच्या बर्थ डेला अभिषेक बच्चन आणि शाहरूख खानही रमले बालपणात! title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या बच्चन यांची मुलगी आराध्या हिचा सहावा बर्थ डे साजरा करण्यात आला. 

बॉलिवूडचे अनेक स्टार्स त्यांच्या लहानमुलांसोबत आराध्याच्या वाढदिवसाला हजर होते. यामध्ये शाहरूख खानसोबत अबराम तसेच शिल्पा शेट्टीदेखील तिच्या मुलासोबत पोहचली होती. 

प्रत्येकामध्ये एक लहान मुल असतं आणि ते जपायला पाहिजे असं म्हटलं जातं. पण या गोष्टीची एक झलक आराध्याच्या बर्थ डे पार्टीमध्ये दिसून आली. 

आराध्य बच्चनचं खास बर्थ डे सेलिब्रेशन 

शिल्पा शेट्टीने पार्टीतील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये बॉलिवूडचा किंग खान त्याच्या मुलासोबत तर अभिषेक बच्चन एकाटाच आकाशपाळण्यामध्ये बसला होता. आराध्या तिच्या मैत्रिणींसोबत आनंद घेतानाचा क्युट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. 

  
  
  
 शाहरूख खानप्रमाणे तारा शर्मा, सोनाली बेंद्रे, फराह खान, आमीर खान यांनीदेखील हजेरी लावली होती.