Arpita Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि त्याचे कुटुंब सध्या चर्चेत आहे. एकीकडे सलमान खानच्या सुरक्षेचा मुद्दा समोर असतानाच आता त्याच्या कुटुंबाबाबत आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. सलमान खानची बहीण अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांच्या संदर्भात आहे. कारण आयुष शर्मा आणि अर्पिता खान यांनी आपलं घर विकण्याचा निर्णय घेतला आहे. तेही चांगल्या किंमतीसाठी.
अर्पिता खानने 22 कोटींना विकले अलिशान घर
पापाराझी विरल भयानी याच्या रिपोर्टनुसार, आयुष शर्मा आणि अर्पिता खान यांनी त्यांची प्रसिद्ध मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी करारही केला आहे. हा सौदा त्याने 22 कोटी रुपयांना केला आहे. आता शर्मा कुटुंब नवीन घरात शिफ्ट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच आयुषने हा मोठा निर्णय घेतला आहे.
Papps च्या पोस्टनुसार, आयुष शर्माने त्यांची वांद्रेची मालमत्ता 22 कोटींना विकली आहे. हे घर खूप प्रसिद्ध होते. पण आता आयुष शर्माने हे अलिशान घर विकण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो आपल्या कुटुंबासह वरळी येथे शिफ्ट होणार आहे.
आयुष शर्मा आणि अर्पिता खान यांचे हे अलिशान घर खूप मोठे आहे. ज्यामध्ये भरपूर जागा आहे. हे अलिशान घर एकूण 1750 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले आहे. अर्पिता खानचे हे घर अनेक अर्थाने खास आहे. इथेच अर्पिताने अनेक खास क्षण निर्माण केले आहेत. जेव्हा जेव्हा करवा चौथ साजरी होते तेव्हा दोन्ही मुलांच्या आठवणीही जोडल्या गेल्या आहेत.
सलमान खानला मिळाली धमकी
बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. सलमान खानला धमकी मिळाली होती. अलीकडेच त्याला पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. ट्रॅफिक पोलिसांना 5 कोटींची मागणी करणारा मेसेज पाठवला असता त्यांनी सलमान खानला जीवे मारण्याची धमकीही दिली. सध्या सलमान खानला Y+ सुरक्षा आहे.