'आयुष्यात काहीच शाश्वत नाही...', पती रुग्णालयात असताना अभिनेत्री भावुक

त्यानंतर दोघांनी आपल्या सुखी संसाराला सुरुवात केली. 

Updated: Jan 6, 2022, 04:52 PM IST
 'आयुष्यात काहीच शाश्वत नाही...', पती रुग्णालयात असताना अभिनेत्री भावुक  title=

मुंबई : अभिनेत्री अभिज्ञा भावे ही सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह असते. ती नेहमीच तिच्या डेली लाईफमधील खास अपडेट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. अभिज्ञाने मागील वर्षी मेहुल पै यांच्यासोबत प्रेम विवाह केला. त्यानंतर दोघांनी आपल्या सुखी संसाराला सुरुवात केली. 

बऱ्याचदा ती पतीसोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर करताना दिसते. तिच्या फोटोमुळे ती खूपच चर्चेत असते. पण सध्या तिने पतीचा शेअर केलला फोटो अनेकांना चिंतेत टाकणारा ठरला आहे. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Abhidnya Bhave Shares 'Special, Happy And Emotional Moments' From Her  Wedding With This Beautiful Video; Watch - Zee5 News

अभिज्ञाने तिचा पती मेहुल पै याचा रुग्णालयातील फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याच्या हातवर पट्टी केल्याचं दिसत आहे. फोटो शेअर करत तिने मोठं कॅप्शन देखील लिहिलं आहे. तिच्या पतीला कोरोनाची लागण झाली आहे.

Tula Pahate Re Actress Abhidnya Bhave Ties The Knot With Mehul Pai, See  Inside Pics! - Zee5 News

ज्यामुळे त्याच्या प्रकृती खालावली आहे. लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी मेहुल अभिज्ञासोबत नाही. दोघेही एकमेकांपासून दूर आहेत. पण पतीची प्रकृती लवकरच ठीक व्हावी यासाठी तिने सगळ्यांना प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. 

तिने पतीवरील प्रेम आपल्या पोस्टमधून व्यक्त केलं आहे. तसंच त्याच्या प्रकृतीत आता सुधार आल्याचं तिने सांगितलं आहे.