''पोट खूप सुटलंय तुमचं'' नेटकऱ्यांच्या कमेंट्सवर भडकली अभिज्ञा भावे, काय म्हणाली पाहा

Abhidnya Bhave Reply to Trollers: अभिज्ञा भावे सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. ती तिच्या आगळ्यावेगळ्या लुकसाठीही चर्चेत असते. सध्या तिनं आपल्या एका नव्या लुकचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर नेटकऱ्यांच्या नानाविध कमेंट्स आल्या आहेत. परंतु यावेळी ती प्रचंड ट्रोल (Abhidnya Bhave Comment on Fat Belly) झाली आहे. यावर तिनं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तरही दिलं आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 28, 2023, 04:44 PM IST
 ''पोट खूप सुटलंय तुमचं'' नेटकऱ्यांच्या कमेंट्सवर भडकली अभिज्ञा भावे, काय म्हणाली पाहा  title=
May 28, 2023 | Abhidnya Bhave अभिज्ञा भावे ही आपल्या बिनधास्त आणि बोल्ड व्यक्तिमत्त्वासाठी ओळखली जाते. सध्या तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. (Photo: Abhidnya Bhave Instagram)

Abhidnya Bhave Trolled: अभिज्ञा भावे तिच्या सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते परंतु त्यासोबतच ती तिच्या बिनधास्त व्यक्तिमत्त्वासाठीही ओळखली जाते. अभिज्ञानं अनेक मराठी मालिकांतून अभिनय केला आहे. नुकतीच तीची 'झी मराठी'वरील 'तू तेव्हा तशी' ही मालिका प्रचंड गाजली होती. त्याआधी ती 'पाहिले नं मी तूला' या मालिकेतून मायराच्या भुमिकेतून दिसली होती. तिच्या या भुमिकचेही सर्वत्र कौतुक झाले होते. कलाकार हे कायमच सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांवरही सेलिब्रेटी (Abhidya Bhave Responds to Comment) व्यक्त होतात. अनेकदा सेलिब्रेटी ट्रोलिंगकडे दुर्लेक्ष करतात परंतु यावेळी अभिज्ञानं मात्र सोशल मीडियावर धार तलवार काढली आहे. परंतु नक्की असं काय घडलंय जाणून घेऊया या लेखातून. 

इन्टाग्रामवर अभिज्ञानं एक व्हिडीओ शेअर (Abhinya Bhave Video on Instagram) केला आहे. ज्यात तिनं ब्लॅक ड्रेस परिधान केला आहे. तिनं यावेळी कंबरेच्या बाजूनं क्रॉस कट आणि स्लिवलेस असलेला वनपीस घातला होता आणि त्याचसोबत खाली तिनं गुलाबी रंगाच्या ट्रान्सपरंट हिल्स घालल्या होत्या. या हिल्समध्ये ती फारच सुंदर दिसत होती. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स आल्या आहेत. परंतु काहींनी मात्र तिला ट्रोल केले आहे. यावर आपलं स्पष्टीकरणही तिनं दिले आहे. एका युझरनं तिच्या या व्हिडीओखाली ''पोट सुटलंय तुमचं'' अशी कमेंट केली आहे. त्यावर अभिज्ञानं प्रत्यूत्तर दिलं आहे. 

काही दिवसांपुर्वी अभिज्ञा प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना वेग आला होता. तेव्हा अभिज्ञा प्रचंड चर्चेत आली होती. यावेळी मात्र तिला तिच्या वाढलेल्या पोटवरून परत ट्रोल करण्यात आलं आहे. काहींनी तिला थेट 'तू गरोदर आहेस का?' असाही प्रश्न विचारला आहे. काही दिवसांपासून तिला कमेंट्समधून असे प्रश्न विचारण्यात आले होते परंतु यावेळी मात्र तिनं आपलं मौन सोडलं आहे. आता एका युझरनं दिलेल्या कमेंटवरून मात्र अभिज्ञा प्रचंड भडकली आहे आणि त्यावरून ट्रोलर्सला तिनं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

हेही वाचा - VIDEO: ''ज्या दादरच्या चाळीत वाढले...'' प्रिया बापटनं दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा

काय म्हणाली अभिज्ञा? 

abhidnya bhave savage reply to the trollers who made rude comment on her belly

'तुमचं पोट सुटलंय' या कमेंटला प्रत्यूत्तर देताना अभिज्ञानं रिप्लाय दिलाय की, ''हो, आणि त्याचबरोबर माझं करिअरपण सुटलंय. पण तुमचं तर फक्त पोटचं सुटलेलं दिसतंय. माझ्या करिअरकडनं प्रेरणा घेतली तर तुमच्या पोटाकडे लोकांचं लक्ष जाणार नाही. तिच्या या कमेंटवर नेटकऱ्यांनी कौतुकचा पाऊसही पाडला आहे.'' परंतु काहींनी तिला याच प्रश्नावर हैराण करून सोडलं. तेव्हा सध्या तिची ही कमेंट चांगलीच चर्चेत रंगली आहे.