ऐश्वर्याचे चुकीच्या पद्धतीने फोटो काढण्यावरुन नाराज झाला अभिषेक

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन काही दिवसांपूर्वी डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी पार्टीसाठी गेले होते. यावेळी ऐश्वर्याने निळ्या रंगाचा शॉर्ट डेनिम वनपीस घातला होता. 

Updated: Nov 9, 2017, 07:52 PM IST
ऐश्वर्याचे चुकीच्या पद्धतीने फोटो काढण्यावरुन नाराज झाला अभिषेक title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन काही दिवसांपूर्वी डिझायनर मनीष मल्होत्राच्या घरी पार्टीसाठी गेले होते. यावेळी ऐश्वर्याने निळ्या रंगाचा शॉर्ट डेनिम वनपीस घातला होता. 

पार्टीहून निघताना अनेक फोटोग्राफर्सनी ऐश्वर्याचे फोटो घेण्यास सुरुवात केली. यावेळी एका फोटोग्राफर चुकीच्या अँगलने फोटो घेत असल्याचे अभिषेकने पाहिले. 

...आणि अभिषेक संतापला

फोटोग्राफरचे हे कृत्य पाहून अभिषेक चांगलाच संतापला. त्याने गाडीतून इशारा करत त्याला जवळ बोलवले आणि फोटो डिलीट कऱण्यास सांगितले. दरम्यान, अभिषेकने फोटोग्राफरला ते फोटो डिलीट करण्यास सांगितल्यानंतरही ऐश्वर्याचे फोटो समोर आलेच. 

ऐश्वर्या लवकरच 'फन्ने खान' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात अनेक वर्षानंतर अनिल कपूरसोबत स्क्रीन शेअऱ करणार आहे. तसेच या सिनेमात ती राजकुमार रावसोबत पहिल्यांदा रोमान्स करताना दिसणार आहे.