अडचणी पाठ सोडेना; अभिनेत्याला दोन वर्षांपूर्वीचा वाद भोवला, विमानतळावरुनच अटक

वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणार अभिनेत्याच्या अचडणीत वाढ  

Updated: Aug 30, 2022, 10:32 AM IST
अडचणी पाठ सोडेना; अभिनेत्याला दोन वर्षांपूर्वीचा वाद भोवला, विमानतळावरुनच अटक title=

मुंबई : अभिनेता कमाल खानला (kamaal khan) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केली आहे. कमाल खानला पोलिसांनी मुंबई विमानतळावरून (Mumbai Airport) अटक केली आहे. वादग्रस्त ट्विट प्रकरणी कमाल खानला बोरिवली कोर्टात हजर करण्यात येणार आहे. कमाल खानवर वादग्रस्त ट्विट केल्याचा आरोप आहे. कमाल खानने हे वादग्रस्त ट्विट  (kamal khan twitter )2020 मध्ये केलं होतं. कमाल खानला मंगळवारी मुंबई विमानतळावर पोहोचताच त्याला अटक करण्यात आली. कमाल खानला आज (मंगळवारी) बोरिवली न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Kamaal Khan: एक्‍टर कमाल खान मुंबई एयरपोर्ट से अरेस्‍ट, विवादित ट्वीट करने का है आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता कमाल खानने 2020 मध्ये एक वादग्रस्त ट्विट केलं होते. अटकेनंतर पोलीस कमाल खानला आज बोरिवली न्यायालयात हजर करणार आहेत. कायम वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता आता एका ट्विटमुळे कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहे. 

'या' ट्विटमुळं कमाल खान वादाच्या भोवऱ्यात 
2020 मध्ये कमाल खानने एक ट्विट (Kamaal Khan social media)  केले होतं, ज्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियावर धर्माला दुखावणारे वादग्रस्त ट्विट केल्याचा आरोप आहे. कमाल खानच्या विरोधात ही तक्रार युवासेना सदस्य राहुल कनाल यांनी केली आहे.  

सांगायच झालं तर, विवाद आणि कमाल खान यांचं फार जुनं नात आहे. अनेक सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आलेला कमाल खान फिल्म रिव्यू देखील करतो.

कमाल खानने अनेक हिंदी आणि भोजपुरी सिनेमांमध्ये काम केलं आहे. कमाल खानने काही सिनेमांची निर्मितीही केली आहे. तो  'बिग बॉस 3' (Bigg Boss 3) चा भाग राहिला आहे.