Actor Hits Couple in Banglore : दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका लोकप्रिय कन्नड अभिनेत्यानं रस्त्यातून चालणाऱ्या कपलला उडवलं आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ माजली आहे. या संदर्भात कन्नड अभिनेता नागभूषण यांना पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी बंगलोर येथे हा प्रकार घडला असून यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. रस्त्यावर चालणाऱ्या भरधाव अभिनेत्याच्या गाडीनं एका कपलला धडक दिली. या अपघातात दुर्दैवानं महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिच्या नवऱ्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
अनेकदा भरधाव वेगानं येणाऱ्या गाड्यावर कारवाई केली जाते. असे प्रकार हे अनेकदा घडलेले आहेत. रस्त्यावरील सुरक्षा ही त्यामुळेच फारच कळीचा मुद्दा झाला आहे. या अपघातात पोलिसांनी योग्य ती कारवाई करायला सुरूवात केली आहे. अभिनेता नागभूषणवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी अभिनेत्याला ताब्यातही घेतले आहे. आत्तापर्यंत अशाप्रकारे अनेक अपघात झाल्याची नोंद आहे. खासकरून हायवेवरती असे अपघात हे घडताना दिसतात. अशा अपघातातून अनेकदा मोठ्या प्रमाणात लोकांना आपला जीवही गमवावा लागला आहे.
'जूम'च्या रिपोर्टनुसार असं सांगण्यात आलं आहे की, पोलिसांनी नागभूषण यांना अटक केली आहे. बंगलोरच्या कुमारस्वामी ट्रॅफिक पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यावेळी भरधाव वेगानं आणि बेजाबदार पद्धतीनं गाडी चालवल्याबद्दल अटक केली आहे. 'इंडिया टूडे' च्या रिपोर्टनुसार, शनिवारी रात्री 9 वाजून 45 मिनिटांनी हा अपघात झाला. वसंत पुरा या रस्त्यावरून हे कपल चालत होते. ते उत्तरहल्लीहून कोनानकुंटे येथे जात होते.
हेही वाचा : 'नशेत आहेस का..' बेधुंद डान्सवरुन अभिनेत्री ट्रोल, नेटकऱ्याला दिलं सडेतोड प्रत्युत्तर
यावेळी त्यानं या कपलला जोरात धडक मारली मग त्याची गाडी ही सरळ वीजेला जाऊन धडकली. यावेळी या गाडीत नक्की तो एकटा होता की त्याच्यासोबत अजून कोणी होतं? नागभूषण हा 'तगारू पाल्या' यामधून प्रेक्षकांसमोर आला होता. मृत व्यक्तीला प्रेमा या 48 वर्षांच्या होत्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी ठेवण्यात आले होते. तर त्यांचे पती कृष्णा, वय वर्ष 58 यांना पायांना, डोक्याला आणि पोटाला जखम झाली आहे.
सध्या यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे. याचा परिणाम या अभिनेत्याच्या करियरवही होण्याची शक्यता आहे. आता पोलिसांनी पुढील हालचाली सुरू केल्या आहेत.
|
IND
(20 ov) 255/5
|
VS |
NZ
159(19 ov)
|
| India beat New Zealand by 96 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
BRN
(20 ov) 130/7
|
VS |
MAS
128(19.5 ov)
|
| Bahrain beat Malaysia by 2 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 140/7
|
VS |
BRN
106(18.5 ov)
|
| Malaysia beat Bahrain by 34 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.