वहिनीशीच लग्नगाठ बांधणाऱ्या अभिनेत्यावर खिळल्या नजरा; Photo Viral

खऱ्या आयुष्यात मात्र त्यांनी .... 

Updated: Dec 1, 2021, 12:35 PM IST
वहिनीशीच लग्नगाठ बांधणाऱ्या अभिनेत्यावर खिळल्या नजरा; Photo Viral
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : लग्नसराईचा बहर सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. कलाविश्वही त्यापासून दूर नाही. तिथे बॉलिवूडमध्ये अनेक स्टार सेलिब्रिटी जोड्या लग्नाच्या तयारीला लागल्या असतानाच इथे, टेलिव्हीजन विश्वातही असंच चित्र पाहायला मिळत आहे. 

'गुम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) या मालिकेमध्ये महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणारे विराट आणि पाखी म्हणजेच नील भट्ट (Neil Bhatt) आणि  ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) एकमेकांचे होऊ शकले नाहीत. 

खऱ्या आयुष्यात मात्र त्यांनी एकमेकांची साथ देत, साता जन्मांचं नातं बांधलं आहे. ही ऑनस्क्रीन दीर आणि वहिनीची जोडी खऱ्या आयुष्यात एकमेकांना साथ देण्यास सज्ज झाली आहे. 

मंगळवारी अभिनेता नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांनी एका खासगी विवाहसोहळ्यामध्ये लग्नगाठ बांधली. 

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून त्यांनी ही आनंदवार्ता सर्वांच्याच भेटीला आणली. या फोटोंच्या निमित्तानं या दोघांचीही केमिस्ट्री सर्वांनाच पाहता आली. 

अतिशय सुरेख कॅप्शन देत सहजीवनाची ही वाटचाल नीलनं सर्वांसमोर ठेवली. यावेळी त्याच्या मनातील आनंद सर्वांसमोर व्यक्त झाला. 

नील आणि ऐश्वर्याच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी या नवविवाहित दाम्पत्याला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. त्यांच्या नव्या प्रवासासाठी सर्वांनी शुभाशिर्वाद दिल्याचं यावेळी पाहायला मिळालं.