मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदीला खंडणीसाठी धमकी मिळाली असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. पूजा बेदीची हॅप्पीसोल डॉट इन ही वेबसाइट हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी पूजाने गोवा पोलीस स्थानकामध्ये तक्रार देखील नोंदवली आहे. हॅकर्सने तिची वेबसाइट पुन्हा सुरू करण्यासाठी खंडणीची मागणी करत धमकी देखील दिली आहे. पूजाच्या तक्रारीनंतर गोव्यातील सायबर पोलिसांचं पथक याप्रकरणी तपास करत आहेत.
Dear @GoDaddyHelp your team is NOT cooperating with our team for my hacked e-commerce website https://t.co/zjGS86eyQX
Despite my deluxe security on your server & SSL the hacker hacked AGAIN yesterday made ransom demands threatening 2 sell my data& sell DRUGS on my site@GoDaddy— Pooja Bedi (@poojabeditweets) October 5, 2020
पूजा बेदी सध्या गोव्यात वास्तव्यास आहे. ती गोव्यामध्ये ई-कॉमर्सच्या मदतीने सेंद्रिय पूरक वस्तूंची विक्री करते. पूजाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पोलिस महासंचालक मुकेशकुमार मीना यांना ट्विटरवर टॅग करत घटनेची माहिती दिली आहे.
ट्विट करत ती म्हणाली, 'हॅकर्सने मला धमकी दिली आहे. जर मी त्यांना खंडणी दिली नाही तर ते माझ्या वेबसाइटवरून ड्रग्सची विक्री करतील. मी गेल्या आठवड्यात ओल्ड गोवा पोलिसांच्या सायबर पोलिसांत एफआयआर दाखल केली आहे, परंतु पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नसल्याचं ट्विट पूजा बेदीने केलं आहे.