मुंबई : खलनायकी भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता राहुल देव (Rahul dev) यानं कायमच त्याच्या खासगी जीवनातील महत्त्वपूर्ण निर्णयांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पत्नीच्या निधनानंतर राहुल आपल्याहून वयानं दहा वर्षांहून अधिक फरकानं लहान असणाऱ्या मुग्धा गोडसे हिला डेट करु लागला.
सुरुवातीच्या दिवसांमध्ये राहुल या नात्याबाबत काहीसा द्विधा मनस्थितीमध्ये होता. ज्याबाबत त्यानं नुंकतंच एका मुलाखतीत खुलासा केला. राहुल देवची पत्नी रीना देवचं 2009 मध्ये निधन झालं. ज्यानंतर चार वर्षांनी त्याच्या जीवनात म्हणजेच 2013 मध्ये मुग्धा गोडसे हिची एंट्री झाली. राहुल आणि रीना यांचा एक मुलगाही आहे, ज्याचं नाव आहे सिद्धार्थ. राहुलला मुग्धासोबतच्या नात्याबाबत संकोचलेपमा तेव्हा वाटला जेव्हा त्याच्या मुलाला या नात्याची माहिती मिळाली होती. पण, मुलाला माहिती झाली त्यामुळं आता जगापासून ही बाब लपवण्यात काहीच अर्थ नाही, असं त्याला वाटत होतं.
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत राहुल म्हणाला, 'जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या अगदी खऱ्या असतात. तुमच्या जीवनात अशी कुणी महत्त्वाची व्यक्ती असेल तर मला कळत नाही, मी त्याच्याविषयी इतरांपासून का लपवू. मला फक्त यावर माझ्या मुलाची काय प्रतिक्रिया असेल याचीच चिंता होती. पण, त्याला जेव्हा याविषयी माहिती झालं तेव्हा मला काहीच अडचण नव्हती.'
मुग्धासोबतच्या नात्यात केव्हा संकोचलेपणा आलेला का, असं विचारलं असता त्याचं उत्तर देत राहुलनं स्पष्ट केलं की, ज्या कुणाचं पहिलं नातं अतिशय सुरेख होतं त्यांच्या मनात या वयात (दुसरं रिलेशन) असं काहीतरी योग्य आहे का, हा प्रश्न असेलच. लहान मुलगा, मुग्धासोबतच्या नात्यात असणारं अंतर या सर्वत गोष्टींची चिंता राहुलला होती. पण, जीवनातील या टप्प्यावरही त्यानं काही महत्त्वाचे निर्णय घेत नात्यांची गुंतागुंत सहजपणे सोडवली.
मुग्धासोबत वडिलांचं रिलेशनशिप; कळताच काय होती राहुल देवच्या मुलाची प्रतिक्रिया ?