मुंबई : कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी दबंग अभिनेता अर्थात सलमान खान देखील मैदात उतरला आहे. देशावर आलेल्या भल्यामोठ्या संकटाचा परिणाम हातावर पोट भराणाऱ्या कामगारांच्या कुटुंबावर झाला आहे. त्यामुळे अशा कामगारांना संकट समयी दिलासा देण्यासाठी सलमान खान पुढे आला आहे. त्याने चक्क २५ हजार कामगारांचे बँक डिटेल्स मागवले आहे. त्यामुळे सलमान पुन्हा एकदा त्याच्या समाजसेवेसाठी चर्चेत आला आहे.
२१ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केली. परंतू १९ मार्चपासूनच सर्व चित्रपट आणि मालिकांचे शूटींग रद्द करण्यात आले होते. त्यामुळे चित्रपट, मालिका, वेबसीरिजमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांच्या दोन वेळच्या जेवणाचे प्रचंड प्रमाणात हाल होत असल्यामुळे त्यांच्या मदतीसाठी सलमानने मदतीचा हात पुढे केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान (Salman Khan) ने इंडस्ट्री च्या मातृ संस्था फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजला (FWICE)फोन करून २५ हजार कामगारांचे बँक डिलेल्स मागवेल आहेत. यापूर्वी करण जोहर, आयुष्यमान खुराना, कियारा अडवाणी, तापसी पन्नू, सिद्धार्थ मल्होत्रा, नितेश तिवारी हे देखील मजदुरांच्या मदतीसाठी पुढे आले होते.
त्यांनी कामगारांना किमान १० दिवस पुरेल असं आवश्यक सामान पुरवलं होतं. शिवाय अक्षय कुमारसोबतच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही मदत केली आहे. सचिनने मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपये आणि प्रधानमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपये दिले आहेत.