सलमानच्या फर्स्ट लूकनंतर 'रेस ३'ची आणखी झलक पाहा

अभिनेता सलमान खानचा नवा सिनेमा  'रेस ३' ईदला रिलीज होत आहेत. या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. या सिनेमाचे आणखी पोस्टर पाहा.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 21, 2018, 04:18 PM IST
सलमानच्या फर्स्ट लूकनंतर  'रेस ३'ची आणखी झलक पाहा title=

मुंबई : अभिनेता सलमान खानचा नवा सिनेमा  'रेस ३' ईदला रिलीज होत आहेत. या सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता आहे. ईदला सलमान हमखास सिनेमा लॉन्च करतो. कारण बॉक्सऑफिसवर त्याचा सिनेमा गल्ला जमतो. त्यामुळे  बॉक्सऑफिस आणि ईद असे सल्लूचे गणित आहे.

सल्लूच्या कुटुबीयांचा लूक

यंदाच्या वर्षीदेखील सलमान खानचा 'रेस ३' हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मात्र, त्याआधी सलमानने ट्विट केल्याप्रमाणे तो आपल्या कुटुंबीयांचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. त्याच्या सिनेमातील बॉबी देओल आणि जॅकलीन फर्नांडिस यांचे पोस्टर त्यांने ट्विटरवर पोस्ट केलेय.

सल्लूचा फर्स्ट लूक 

सलमान खानच्या 'रेस ३' या चित्रपटातील त्याची पहिली झलक रसिकांच्या भेटीला १९ मार्चला पाहायला मिळाली. दमदार लूकमधील सलमान खान हातामध्ये गन आणि डोळ्यांवर स्टाईलिश गॉगल घातलेला पहिला अंदाज रसिकांसमोर आलाय. 'रेस ३' या चित्रपटामध्ये सलमान खानच्या भूमिकेचं नाव 'सिकंदर' आहे.  

रेमोचे दिग्दर्शन 

कोरिओग्राफर रेमो डिसुजा 'रेस ३' चे दिग्दर्शन करणार आहे. 'रेस'च्या सिक्वेलमध्ये सलमान खान पहिल्यांदा झळकणार आहे. अभिनेते अनिल कपूर यांनीदेखील ट्विट करून 'सिकंदर हा पहिला रेसर...' असे म्हणत ट्विट केलं आहे. सलमान खानने देखील या आठवड्यात 'रेस ३' च्या परिवारातील मंडळीशी तुमची ओळख करून देतो असे ट्विट केले होते. त्यानुसार त्याने  बॉबी देओल आणि जॅकलीन फर्नांडिस यांचे पोस्टर पोस्ट केलेय.

जॅकलीन फर्नांडिस 

 

बॉबी देओलची झलक