मुंबई : अभिनेते शशी कपूर यांचे मुंबईत ७९ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शशी कपूर आजारी होते. मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयामध्ये शशी कपूर यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र दीघा आजारपणानंतर त्यांचे निधन झाले.
शशी कपूर हे बॉलीवूडचे पितामह पृथ्वीराज कपूर यांचे सुपुत्र होते. शशी कपूर यांचे मूळ नाव बलबीर राज कपूर होते.
शशी कपूर यांचे बॉलिवूडमध्ये पदार्पण हे चाईल्ड अॅक्टर म्हणून झाले होते. राज कपूर यांच्या आवारा आणि आग चित्रपटांमध्ये त्यांनी चाईल्ड अॅक्टर म्हणून काम केलं आहे.
भारत सरकारच्या पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना २०११ साली गौरवण्यात आले होते. तसेच २०१४ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवले होते. त्यांना 3 वेळा राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले.