अखेरच्या क्षणी सिद्धार्थसोबत आपली झलक पाहन पाहा काय झाली Shahnaz Gill ची अवस्था

सिद्धार्थच्या जाण्याचं दु:ख ती अद्यापही विसरु शकली नाही

Updated: Oct 22, 2021, 09:54 AM IST
अखेरच्या क्षणी सिद्धार्थसोबत आपली झलक पाहन पाहा काय झाली Shahnaz Gill ची अवस्था
व्हिडीओ स्क्रीनग्रॅब

मुंबई : अनेक तरुणींच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यानं काही दिवसांपूर्वीच जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थच्या निधनाचं वृत्त कलाविश्वासोबतच चाहत्यांनाही जबर धक्का देऊन गेलं. या साऱ्यामध्ये त्याची खास मैत्रीण आणि कथित प्रेयसी शहनाज गिलसुद्धा कोलमडून गेल्याची माहिती समोर आली. किंबहुना तिच्या चेहऱ्यावरुनच हे स्पष्ट दिसत होतं. 

शहनाज आणि सिद्धार्थची जोडी चाहत्यांच्याही आवडीची. अशी ही जोडी अखेरच्या वेळी सर्वांसमोर एकत्र झळकली आहे. निमित्त आहे ते म्हणजे 'Habit' हे गाणं. शहनाज आणि सिद्धार्थवर चित्रीत करण्यात आलेलं हे गाणं सध्या कमालीचं चर्चेत आलं आहे. 

सिद्धार्थसोबतची आपली झलक पाहून शहनाजला दु:ख अनावर होत असल्याचंच या गाण्याच्या व्हिडीओमध्येही पाहायला मिळत आहे. सिद्धार्थनं निधनापूर्वी या गाण्य़ाचं चित्रीकरण केलं होतं. पण, त्याच्या मृत्यूनंतर मात्र हे गाणं पूर्ण कोण करणार हाच प्रश्न उभा राहिला होता. ज्यावर तोडगा म्हणून शहनाजनंच पुढाकार घेत हे गाणं पूर्ण केलं. गाणं जसजसं पुढे जातं तसतसं ते अधिकच भावनीक होत जात आहे, ज्यामुळं शहनाजलाही तिचं दु:ख लपवणं अशक्य असल्याचं दिसत आहे. 

अतिशय कमी वेळातच शहनाज आणि सिद्धार्थचं हे गाणं आणि त्याचा व्हिडीओ कमालीचा व्हायरल होत आहे. चाहत्यांनी या गाण्याला पसंती दिली असून, ते शहनाजला आधारही देताना दिसत आहेत.