तिच्यासाठी काहीपण....! बिग बींकडून अभिनेत्रीला खास भेट

तिच्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा क्षण ठरला....   

Updated: Nov 26, 2020, 07:00 PM IST
तिच्यासाठी काहीपण....! बिग बींकडून अभिनेत्रीला खास भेट
संग्रहित छायाचित्र

मुंबई : महानायक, बिग बी अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी कायमच आपल्या भूमिकांतून आणि दैनंदिन जीवनातून इतरांना प्रोत्साहन दिलं आहे. नव्या पिढीतील अनेक कलाकारांचे ते आदर्श आहेत. मुख्य म्हणजे बिग बी स्वत:सुद्धा या पिढीकडून खुप काही शिकत असतात. त्यांच्या कामाला दादही देत असतात, अगदी त्यांच्याप्रती आभाराची भावनाही व्यक्त करत असतात. 

सध्या अशात एका युवा अभिनेत्रीसाठी त्यांनी असं काही केलं की तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. बिग बींनी अभिनेत्री आहाना कुम्रा हिला एक खास पत्र लिहिलं. स्वत:च्या हस्ताक्षरात पत्र लिहित त्यांनी दिवाळी भेट पाठवल्याबद्दल अभिनेत्रीचे आभार मानले आहेत. इतका मोठा कलाकार आपल्याला पत्राच्या माध्यमातून आभार मानत खऱ्या अर्थानं एक वेगळीच अनुभूती देऊन जातो हीच भावना आहानानं व्यक्त केली.

 

सोशल मीडियावर पोस्ट लिहित आहानानं तिचा आनंद व्यक्त केला. अमिताभ बच्चन आणि त्यांच्या पत्नी जया बच्चन यांच्याकडून आभार व्यक्त कसे करावेत हे आपण शिकू इच्छितो, असं तिनं लिहिलं. सहकलाकारांप्रती त्यांच्या वागण्याचा आपल्याला हेवा वाटत असल्याची भावनाही तिनं व्यक्त केली. (Aahana Kumra) नं 'युद्ध' (Yudh) या कार्यक्रमात अमिताभ बच्‍चन (Amitabh Bachchan) यांच्या मुलीची भूमिका साकारली होती.