मुंबई : अभिनेता सलमान खान (Salman Khan) आज एक प्रसिद्ध अभिनेता असला तरी, करीअरच्या सुरुवातीला अनेक प्रकरणांमुळे भाईजान वादाच्या भोवऱ्यात अडकला. अनेकता स्वतःच्या रागीट स्वभावामुळे सलमानपासून त्याचे अनेक मित्र त्याच्या पासून दुरावले गेले. एकेकाळी सलमान आणि शाहरुखच्या मैत्रीचे किस्से सर्वत्र रंगलेले असायचे, तर दुसरीकडे दोघांमध्ये झालेल्या भाडणांमुळे चाहत्यांना मोठा धक्का. पण एवढंच नाही अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत सलमानचं ब्रेकअप आजही चर्चेत आहे.
दरम्यान अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी जेव्हा करियरची सुरूवात केली, तेव्हा त्यांच्या मैत्रीचे किस्से कायम रंगायचे. दोघी एकत्र वर्ल्ड टूरसाठी देखील गेल्या होत्या. पण तो एक दिवस आणि दोन्ही अभिनेत्रींमध्ये असलेली मैत्री संपली.
ही मैत्री तुटण्यामागे अनेक किस्से प्रसिद्ध झाले, त्यातील एक म्हणजे शाहरुख खान आणि राणी मुखर्जीचा 'चलते चलते' सिनेमा. सिनेमात राणीच्या आधी ऐश्वर्याला कास्ट करण्यात आलं होतं, मात्र शूटिंगदरम्यान सलमान खानने असा राडा केला की, निर्मात्यांना ऐश्वर्याला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखवला. यानंतर सिनेमा राणीला मिळाला.
या घटनेनंतर राणी आणि ऐश्वर्याच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण अनेक वर्षांनी राणी आणि ऐश्वर्या एकत्र दिसल्या. निमित्त होतं, दिग्दर्शक करण जोहरचा 50 वा वाढदिवस.
एका व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये राणी आणि ऐश्वर्या एकाचं फ्रेममध्ये दिसत आहे. फोटोमध्ये करिना कपूर, प्रिती झिंटा, राणी मुखर्जी आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसत आहेत.