‘हम है नये, अंदाज क्यू हो पुराना?’ पाठकबाईंनी धरला ठेका

 पाठकबाईंचा नवा अंदाज पाहिलात का?     

Updated: Mar 13, 2021, 04:05 PM IST
‘हम है नये, अंदाज क्यू हो पुराना?’ पाठकबाईंनी धरला ठेका  title=

मुंबई : 'तुझ्यात जीव रंगला मालिके'च्या माध्यमातून थेट चाहत्यांच्या  मनात घर केलेल्या  अभिनेत्री अक्षया देवधरचा एक भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाठकबाईंनी  ‘हम है नये, अंदाज क्यू हो पुराना?’ गाण्यावर ठेका धरला आहे. अभिनय कौशल्यासोबतच पाठकबाईंचं नृत्य कौशल्य देखील भन्नाटचं आहे.  खुद्द अक्षयाने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. 

व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'या तो दोस्ती गहरी है... या ये video 3D हैं!!!' असं लिहिलं आहे. या व्हिडिओमध्ये पाठकबाईंच्या दोन मैत्रिणी देखील अक्षयासोबत डान्स करताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

अक्षया सोशल मीडिया कायम सक्रिय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती कायम फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.  अक्षयाला 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या माध्यमातून चांगलीच प्रसिद्धी मिळाली. 

 तुझ्यात जीव रंगला मालिका ऑफ एआर गेल्यानंतर ‘अंजली बाई’ अर्थात अभिनेत्री अक्षया देवधरने फिटनेसकडे आपला मोर्चा वळवला आहे. मालिका संपली असली तरी 'अंजली बाई' आणि 'राणा दा' चाहत्यांच्या मनात कायम आहेत.