अभिनेत्री कंगना रानौतचे बोल्ड फोटो व्हायरल

कंगनाच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटवर लावला तडका  

Updated: Nov 13, 2021, 10:21 AM IST
अभिनेत्री कंगना रानौतचे बोल्ड फोटो व्हायरल   title=

मुंबई : वादग्रस्त वक्तव्यांचा मुकूट कायम आपल्या डोक्यावर घेवून मिरवणारी अभिनेत्री कंगना रानौत सध्या तुफान चर्चेत आहे. सध्या कंगनाचे काही हॉट फोटो तुफान व्हायरल होत आहेत. खुद्द कंगनाने स्वतःचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. फोटो पाहून काही चाहत्यांनी तिच्या लूकची खिल्ली उडवली तर काही चाहत्यांना तिचा हा हॉट लूक प्रचंड आवडला.

काही दिवसांपुर्वी कंगनाचे तिच्या आगामी 'धाकड' चित्रपटाची शूटिंग परदेशात पूर्ण केली. त्यानंतर तिने एक रॅप-अप पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा हॉट ड्रेस घातला होता. सध्या तिच्या या हॉट आणि ग्लॅमरस लूकने चाहत्यांना घायाळ केलं. 

कंगनाने फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये “प्रेमामद्ये जगणे व मरने यात काहीच फरक नाही, त्या व्यक्तीला पाहून जगते, ज्याच्या काफिरमद्ये प्राण जाईल….'  असं लिहिलं आहे. तिच्या हॉट फोटोंसह  तिचे कॅप्शन देखील तुफान चर्चेत आहे. 

दरम्यान, कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती पुढे 'धाकड' मध्ये दिसणार आहे. ज्यात अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय, ती 'तेजस' चा देखील एक भाग आहे जिथे ती हवाई दलाच्या पायलटच्या भूमिकेत दिसणार आहे.