Bollywood Retro:आज चित्रपटसृष्टीत अनेक बदल झाले आहेत, काळानुसार सिनेमाची व्याख्या बदलली आहे. अभिनेत्री आणि अभिनेता सहज इंटिमेंट सीन करताना दिसतायत.हा बदल संपूर्ण चित्रपटसृष्टीत 90 च्या दशकात दोन कलाकारांनी केला होता. 1993 साली प्रदर्शित झालेल्या‘कर्मा’या चित्रपटात प्रसिद्ध निर्माता आणि अभिनेता हिमांशू राय आणि देविका राणी यांनी हा पहिला किसिंग सीन दिला होता. भारतीयांनी बनवलेला असा हा पहिला इंग्रजी भाषिक चित्रपट होता. इतकंच नाही, तर देविका राणी हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला किसिंग सीन देणाऱ्या अभिनेत्री बनल्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा किसींग सीन तब्बल 4 मिनिटांचा होता. देविका राणी यांनी हा सीन दिल्यानंतर त्यांच्यावर जोरदाक टीका झाली होती. याशिवाय त्यांच्या चित्रपटांवर बंदी घालण्यात आली होती.
असा काळ जेव्हा मुलींना घराबाहेर पडण्यासाठी अनेक संकटांना तोंड द्यावं लागायचं, त्याचवेळी अभिनेत्री होण्याचं स्वप्न देविका राणी यांनी जोपासलं होतं. भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी काम करणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक देविका राणी आहेत.. 'कर्मा चित्रपटातील किसिंग सीनच्या वादानंतर अभिनेत्री देविका राणी आणि हिमांशू राय यांनी लग्न केलं होतं.
'ड्रॅगन लेडी' म्हणून ओळख
अभिनेत्री देविका राणी या त्याकाळी टॉपच्या अभिनेत्रीपैंकी एक होत्या. फक्त किसिंग सीनमुळेच नाही तर त्यांच्या स्वभावाने आणि सवयींमुळे देखील नेहमी चर्चेत होत्या, त्यामुळे 'ड्रॅगन लेडी' अशी त्यांची एक ओळख निर्माण झाली होती. तसचं त्यांच्या अभिनयाच्या स्टाईलची तुलना ग्रेटा गार्बोशीही केली जायची यामुळे त्यांना ‘इंडियन गार्बो’असंही म्हटलं जायचं.
सन 1970 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात झाली. हा भारतीय सिनेमाचा सर्वात मोठा पुरस्कार आहे. या पुरस्काराची पहिला मानकरी अभिनेत्री देविका ठरल्या. त्याशिवाय पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या देविका राणी या चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला ठरल्या.