Raj Kundra Case : पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीचा हा व्हिडिओ व्हायरल

राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीला देखील लोकं ट्रोल करत आहेत.

Updated: Jul 27, 2021, 07:54 PM IST
Raj Kundra Case : पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीचा हा व्हिडिओ व्हायरल

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा सध्या चर्चेत आहेत. अश्लील चित्रपट बनवून मोबाईल अ‍ॅपवर अपलोड केल्याचा आरोप राज कुंद्रावर आहे. सध्या राज यासंदर्भात मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या ताब्यात असून त्याची सतत चौकशी केली जात आहे. राज कुंद्राची पोलीस कोठडी आज संपली. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. 

या प्रकरणात पोलिसांना आतापर्यंत अनेक पुरावे मिळाले आहेत आणि दररोज नवे खुलासे होत आहेत. दरम्यान, शिल्पा शेट्टीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा तिचा नवरा राजच्या स्ट्रगलच्या दिवसांबद्दल बोलताना दिसत आहे.

शिल्पा शेट्टीचा हा व्हायरल व्हिडिओ फिटलूक मॅगझिन नावाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या थ्रोबॅक व्हिडिओमध्ये शिल्पा माध्यमांशी बोलताना दिसत आहे. राजचे वडील लंडनमध्ये बस कंडक्टर होते. आई कारखान्यात काम करत होती. त्यावेळी त्याच्या आईला 6 महिन्यांचे एक मूल होते. त्या मुलाच्या हातात बाटली देऊन कामाला जायची आणि ब्रेक मिळताच त्याच्याकडे यायची. त्यामुळे राजने खूप संघर्ष केला आहे. 

शिल्पा शेट्टीचा हा व्हिडिओ राज कुंद्राच्या अटकेनंतर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर सतत प्रतिक्रिया येत आहे. त्याचवेळी शिल्पाला ट्रोल देखील केलं जात आहे.

शिल्पा शेट्टीचा 'हंगामा 2' हा मल्टीस्टारर सिनेमा 23 जुलै रोजी रिलीज झाला आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा मस्त शैलीत दिसली आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन दिग्दर्शित या चित्रपटात मीझान जाफरी, परेश रावल, प्रणिता सुभाष मुख्य भूमिकेत आहेत. त्याचबरोबर या माध्यमातून शिल्पा 14 वर्षानंतर बॉलिवूडमध्ये परतली आहे. म्हणूनच शिल्पा आणि तिचे कुटुंब, चाहते, मित्र यांच्यासाठी हा चित्रपट खूप खास आहे. हा चित्रपटावर प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद येत आहे.