close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

फुटपाथवर फोटोशूट करणाऱ्या अभिनेत्रीला सलमानपासून सावध राहण्याचा सल्ला

राहुल गांधी यांच्यासाठी तिने उपवासही केला होता...... 

Updated: Jun 4, 2019, 07:06 PM IST
फुटपाथवर फोटोशूट करणाऱ्या अभिनेत्रीला सलमानपासून सावध राहण्याचा सल्ला

मुंबई : अभिनेत्री माहिका शर्मा विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. राहुल गांधींसाठी उपवास ठेवण्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिलाच्या सुरक्षेसाठी काम करण्याचा सल्ला देण्यापर्यंत प्रत्येक वेळी माहिका असं काही विधान करते की, सोशल मीडियावर तिचीच चर्चा सुरू राहते.

Actress Mahika Sharma spotted sleeping

 

सध्याही ती अशाच एका फोटोमुळे चर्चेत आली आहे. माहिका चर्चेत येण्याचं कारण ठरत आहे, तिचं आगळंवेगळं फोटोशूट. याच फोटोशूटमधील एका फोटोमध्ये ती फुटपाथवर झोपलेली दिसत आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या फोटोला लाईक्स करणाऱ्यांपेक्षा त्यावर टीका करणाऱ्यांची आणि तिची खिल्ली उडवणाऱ्यांचीच संख्या जास्त दिसत आहे. माहिकाने फोटोसोबत दिलेलं कॅप्शनही यासाठी कारणीभूत ठरत आहे.

‘जेव्हा घर दूर असतं... आणि तुम्हाला आराम करावासा वाटतो.....’ असं लिहित तिने ‘अंदाज अपना अपना’ या ओळी कॅप्शनमध्ये अधोरेखित केल्या. तिचा हा फोटो आणि कॅप्शन पाहता, एका युजरने तिला चक्क सलमानपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. काही वर्षांपूर्वीच्या हिट ऍण्ड रन घटनेचा संदर्भ त्या युजरने येथे दिल्याचं पाहायला मिळालं. या युजरची कमेंटही सोशल मीडियावर बरीच चर्चेत आली होती.

राहुल गांधी यांच्यासाठी उपवास करण्याच्या वक्तव्यानंतर माहिका प्रकाशझोतात आली होती. मी देशाच्य. उज्वल भवितव्यासाठी उपवास करत आहे, जे भवितव्य राहुल गांधी यांच्याच हाती आहे; असं ती म्हणाली होती. राहुल गांधी निवडणुकीच्या रिंगणात अपयशी ठरले, पण माहिका मात्र भलतीच प्रकाशझोतात आली. पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी निवडुन आल्यानंतरही तिने पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं. मोदी या देशाला बलात्कारमुक्त आणि दहशतवादमुक्त करण्यात यशस्वी ठरलीत असा आशावाद तिने व्यक्त केला होता.