Mrinal Navell Casting Couch: बॉलिवूडमध्ये अद्यापही कास्टिंग काऊचचे प्रकार सुरू आहेत. आता त्याला आळा घालायला हवा, असा सूर अनेकदा उमटताना दिसतो. सध्या अशाच एका अभिनेत्रीनं पुन्हा एकदा कास्टिंग काऊचचा मुद्दा हा उपस्थित केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काम हवं असेल तर कॉम्प्रोमाईज करावं लागले असं अनेकदा म्हटलं जातं. महिला कलाकारांना नेहमी अशा गोष्टींना सामोरे जावे लागते त्यामुळे कामाच्या ठिकाणी येणारा असा हा अनुभव फारच विदारकच असतो यात काहीच दुमतं नाही. काही वर्षांपुर्वी मीटूच्या चळवळीनं अशा कैक मुद्यावरून महिला आपणहून बोलायला लागल्या होत्या. त्यातून काही महिला या फक्त ढोंग करत आहे, मुलीही तशाच असतात. असाही आरोप त्यांच्यावर झाला होता. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली होती. लैंगिक छळ आणि कास्टिंग काऊचच्या मुद्द्यावरून एका लोकप्रिय अभिनेत्री आता तिचा अनुभव शेअर केला आहे.
अभिनेत्री म्रिनाल नवेली हिनं यावेळी आपला कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. ही अभिनेत्री 'कुंडली भाग्य' या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर आली होती. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली आता आहे. तिला एका जाहिरातीसाठी तडतोड करण्याची मागणी एका कास्टिंग एजंटनं केली होती. यावेळी 'हिंदूस्तान टाईम्स'शी बोलताना ती म्हणाली, ''वर्षभरापुर्वी मी माझा पहिला शो करत होते. मी टीव्हीच्या जाहिरातींसाठी अनेक ऑडिशन्स देत होते. तिथल्या एका कास्टिंग एजंटनं मला सांगितलं की दोन मुलींची निवड करण्यात आली आहे. त्यापैंकी एक कार्तिक आर्यनसोबत जाहिरात करणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला मेसेज आली की तुला ही भुमिका मिळवण्यासाठी कॉम्प्रोमाईज करावं लागेल. तेव्हा याचा अर्थ मला माहिती नव्हता. पण तरीही त्याला नेमकं काय म्हणायचंय हे मला जाणून घ्यायचं होतं.'', असं ती म्हणाली.
ती पुढे म्हणाली की, ''मी त्यांना विचारलं की तुम्ही कोणत्या कॉम्प्रोमाईजबद्दल बोलत आहात? तेव्हा त्यानं उत्तर दिलं की, फक्त एक कॅज्युअल हुकअप, फक्त एक रात्र आणि आपण तिथेच कॉन्ट्रॅक्टवर सही करू शकतो. हे ऐकताच माझा संताप झाला. मग मी त्याला सुनावलं. मग त्यानं तो मेसेज डिलीट केला. मी त्याला म्हटलं की अशा गोष्टींची गरज नाही. त्यानंतर माझ्यासाठी ही सुवर्णसंधी आहे आणि मी ती जाऊ देऊ नये असं तो मला म्हणाला. तेव्हा तर त्यानं माझ्यावर दबाव आणायला सुरूवात केली. तेव्हा तर मला प्रचंड राग आला आणि मी त्याला तेव्हा आणखीनंच सुनावलं. तेव्हाच तो तिला असंही म्हणाला की, कलाकारांना चित्रपट कसे मिळतात तुला माहित नाही. सर्वांना असं करावं लागतं. तू आता तयार झालीस तर तुला चित्रपट मिळवून देईन असा त्यानं दावा माझ्याकडे केला. यानंतर मी त्याला ब्लॉक केलं.'' असं ती म्हणाली.
'ही' सावधानता बाळगा
''बर्याच ऑडिशन्समध्ये मुली तोकड्या कपड्यांमध्ये बसलेल्या असतात आणि त्यांच्याकडे लोकं खूप विचित्रपणे आणि वाईट नजरेनं पाहतात. पण मुलींनी याबाबत काळजी घ्यायला हवी. या गोष्टींचा विरोध करायला हवा. निर्माते, कास्टिंग एजंट्स ऑडिशनमध्ये मुलींना तोकडे कपडे घालायला सांगतात. पण ऑडिशनमध्ये अभिनय आणि लूक पाहायचा असतो. त्यासाठी तोकडे कपडे घालणं गरजेचं नसतं. इंडस्ट्रीत असे बरेच लोक आहेत त्यामुळे आपण सावधगिरी बाळगली पाहिजे'', असंही ती म्हणाली.