Nargis Fakhri Got Angry On Discussion of Personal Life : बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी ही लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. नर्गिस ही रॉकस्टार या चित्रपटामुळे प्रकाश झोतात आली होती. नर्गिस ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नर्गिस फाखरी अनेक गोष्टींबद्दल तिचं मत मांडत संतापलेली दिसली. यावेळी नर्गिस तिचं आयुष्य खाजगी ठेवायचे आहे, हे सांगत आज काल सेलिब्रिटींचे खासगी आयुष्य देखील सगळ्यांना माहित असतं.
नर्गिसनं नुकतीच 'न्यूज18' ला मुलाखत दिली आहे. सर्वसामान्य लोकांप्रमाणे सेलिब्रिटींनाही त्यांचे आयुष्य खाजगी ठेवायचे असते, पण त्यांच्या आयुष्याविषयी सगळ्या गोष्टी लपवून ठेवणं शक्य नसतं. याशिवाय त्यांचे आवडते सेलिब्रिटी हे कोणाला डेट करत आहेत हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. याविषयी प्रश्न विचारता नर्मिग म्हणाली, 'मी प्रामाणिक आहे. जर लोकांनी मला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारलं तर मला त्यात काही अडचण नाही. पण मुद्दा असा आहे की इथले लोक कामाऐवजी यावरच लक्ष केंद्रित करतात.'
पुढे नर्गिस म्हणाली, 'मला वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलण्यात काहीच अडचण नाही, पण मला माझ्या कामाला हायलाइट करायचं आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांना आपल्या आयुष्याविषयी बोलण्यात अडचण असते. ठिक आहे आपण त्यांच्या प्रायव्हसीचा आदर केला पाहिजे. पण हे सगळं खूप विचित्र काम आहे.'
हेही वाचा : Sayali Sanjeev: अशोक सराफ यांचा एक सल्ला अन् सायली संजीवचं आयुष्यच बदललं!
इंटरनेटमुळे सेलिब्रिटींच्या प्रायव्हसीचे उल्लंघन झाल्याचे नर्गिस यांचे म्हणणे आहे. आपण आपल्या फोनवर काय पाहतो आणि आपल्याला काय पाहायचे आहे हे सोशल मीडियालाही कळते. खरंतर मी कधी कधी विचार करते की मी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे या गोष्टीचा विचार लोक का करतात. पण मी या गोष्टीला नेहमीच चांगल्या पद्धतीनं सांभाळलं आहे. नर्गिसला असे वाटते की आपण सगळे इथे न्यूड आहोत. दरम्यान, नर्गिस सगळ्यात शेवटी 'हरि हर मल्लू' या तमिळ चित्रपटात दिसली होती.