मुंबई : मागील 5 वर्षांपासून बाळाच्या जन्मासाठी प्रयत्न करणारी अभिनेत्री आता अखेर लग्नबंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे. गेल्या 12 वर्षांपासून एका व्यक्तीसोबत प्रेमाच्या नात्यात असणाऱ्या या अभिनेत्रीनं जाहीर कार्यक्रमादरम्यान आपल्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.
ओक्साबोक्शी रडत तिनं आपल्याला मातृत्त्वाचं सुख मिळत नसल्याचं सांगितलं. प्रियकर - लिव्ह इन पार्टनरला 'तू दुसऱ्या कुणाचातरी विचार कर', असं काळजावर दगड ठेवून सांगणारी ही अभिनेत्री आहे, पायल रोहतगी (Payal Rohatgi).
इतक्या वर्षांचं एकनिष्ठ प्रेम, समर्पकता आणि विश्वासाच्या बळावर उभं असणारं हेच नातं आता पायल आणि तिचा प्रियकर एका नव्या टप्प्यावर नेत या नात्याला लग्नाचं नाव देणार आहेत. संग्रामच्या वाढदिवसाला म्हणजेच, 21 जुलै या दिवशी ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. (actress Payal rohatgi and Sangram sing ready to tie a knot plans july wedding )
एका मुलाखतीदरम्यान खुद्द संग्रामनंही आनंद व्यक्त करत, अखेर तो क्षण आल्याचं म्हटलं. लग्नाचा विचार केल्यानंतर असं काहीतरी घडायचं आणि लग्न पुढे ढकललं जायचं... हे असंच घडत असल्याचं संग्रामनं सांगितलं.
लग्न म्हणजे निव्वळ एक शिक्का आहे, असं म्हणत एका मुलीसाठी मात्र हे अतिशय महत्त्वाचं वळण असल्याची बाब त्यानं सर्वांसमोर मांडली. जोडीदाराला एखादं फुल देण्यापेक्षा त्यांना आदर देणं कधीही मोलाचं असेल असा विचारही त्यानं सर्वांपुढे मांडला.
पायल आणि संग्राम एका मंदिरात लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. आर्य समाज्याच्या धारणांनुसार हे लग्न पार पडेल. लग्नसमारंभापूर्वी हळद आणि मेहंदी कार्यक्रमही आयोजक केले जाणार असल्याचा खुलासा संग्रामनं केला.