Evergreen actress Rekha and Controversies: रेखा! भारतीय सिने इंडस्ट्रीमधील एक एव्हरग्रीन अभिनेत्री. वयाच्या तेराव्या वर्षांपासून त्यांनी सिने सृष्टीत पदार्पण केलं. आजही रेखा कोणतंही पात्र तेवढ्याच बहरदारपणे निभावू शकतात. इंडस्ट्रीत कुणीही बिगबॉस नसताना स्वतःची वेगळी ओळख रेखा (Actress Rekha created her own Identity) यांनी निर्माण केली. रेखा यांचा सिनेसृष्टीतील हा संपूर्ण प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे (Life journey of Rekha). अभिनेत्री रेखा यांच्याबाबत सिने इंडस्ट्रीत अनेक वावड्या उठल्या, अनेक गॉसिप्स समोर आल्यात (Gossips of rekha). मात्र या सगळ्यांना मागे सारत रेखा यांचा अभिनय कायम उजवा ठरला आणि त्यालाच प्रेक्षकांनीही भरभरून प्रेम दिलं.
अभिनेत्री रेखा यांना 1969 मध्ये 'अंजना सफर' चित्रपटाची ऑफर (Rekha got offer for Anjana Safar Movie) आली. तेव्हा रेखा यांच्या आईने त्यांचं सिनेमात काम करण्यासाठी मन वळवलं. शूटिंग दक्षिण आफ्रिकेत होणार होतं. यामुळेच रेखा हा सिनेमा करायला तयार देखील झाल्यात. आईनेचे सिनेमात काम करण्यास रेखा याना तयार केलं. रेखा यांचा दक्षिण आफ्रिकेतील शूटिंगचा अनुभव चांगला होता. मात्र याच सिनेमाचं मुंबईत देखील शूटिंग होणार होतं. दरम्यान मुंबईत रेखा यांच्यासोबत जे झालं त्याची सर्वत्र चर्चा झाली. (Rekha and Anjana Safar) सिनेमा रिलीज होण्याआधीच याची मोठ्या प्रमाणात चर्चाही झाली.
रेखा इंडस्ट्रीत नवीन होत्या. रेखा यांच्या आईंना रेखा यांची प्रचंड काळजी होती. अशात शुटिंच्यावेळी रेखा यांच्या आईने सिनेमाच्या निर्मात्यांना विशेष सूचना दिल्याचं समजतं. रेखा यांच्या जेवणात कोणतीही कमतरता नसावी, त्यांना सतत काहीतरी खायला द्यावं, अशी विशेष सूचना रेखा यांच्या आईने त्यावेळी दिल्याचं बोललं जातं.
रेखा मुंबईत नव्या होत्या. रेखा यांना मुंबईची भाषा अंगवळणी पडायला कठीण जात होती होती. अनेकदा भाषेमुळे त्यांना संवाद साधणे कठीण जायचे. अशात मुंबईतील 'अंजना सफर' या सिनेमाच्या शूटवेळी रेखा यांचा अनुभव (Bad experiance of rekha on movie set) वाईट राहिला. खरंतर या सिनेमामध्ये एक किसिंग सिन होता. हा किसिंग सिन (Rekha and kising shot) करण्यास रेखा यांनी सुरुवातील घाबरून स्पष्ट नकार दिला होता. मात्र सिनेमाची गरज असल्याचं पटवून दिल्यानंतर रेखा या सीनसाठी तयार झाल्यात. मात्र हा सिन करताना रेखा एवढ्या घाबरल्या होत्या की त्यांचं हे घाबरणं स्क्रीनवर स्पष्ट पाहायला मिळू शकतं. चेहऱ्यावर भीती दिसू नये म्हणून सिन वारंवार शूट करण्यात येत होता. दरम्यान हा शॉट देताताना रेखा यायांना भुरळ (rekha fainted during kissing shot in movie) आली आणि त्या पडल्याचं बोललं जातं.
रेखा यांच्या किसिंग सीनमुळे त्यावेळी प्रचंड वाद झाला. या वादात सेन्सॉर बोर्डाने उडी घेतली (Censor Board and Anjana Safar Movie Controversy). या सिनेमातील हा किसिंग सिन हटवण्यास सांगण्यात आला. यानंतर हा सिनेमा एक दोन नव्हे तर तब्बल 10 वर्षांनंतर रिलीझ झाला. महत्त्वाची बाब म्हणजे दहा वर्षानंनतर हा सिनेमा सेन्सर बोर्डाकडे पाठवण्यात आला. तब्बल दहा वर्षांनंतर हा सिनेमा दो शिकारी (Do shikari) या नावाने 1979 मध्ये रिलीज करण्यात आला.
Actress rekha fainted durisng kissing shot of anjana safar movie later movie released after 10 years with the name of Do Shikari