मुंबई : काही दिवसांपूर्वी हॉलिवूड निर्माता हार्वी वाइंस्टीनवर अनेक अभिनेत्रींनी कास्टींग काऊच आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला. त्यानंतर जगभरातून #MeToo हा हॅशटॅग वापरून कॅम्पेन चालवण्यात आलं. ज्याद्वारे अनेक अभिनेत्री आणि महिलांनी त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचाराचा अनुभव जगासमोर मांडला. आता यात आणखी एका मोठ्या अभिनेत्रीचं नाव जोडलं गेलंय.
‘फ्रिडा’ सिनेमाची स्टार सलमा हायेकने आरोप लावलाय की, निर्माता हार्वी वाइंस्टीनने तिचं लैंगिक शोषण केलंय. सलमाने एका वृत्तपत्राला तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितले. ती म्हणाली की, ‘अनेक वर्षांपर्यंत तो(वाइंस्टीन) माझं रक्त पिणारा रक्तपिपासू होता. प्रत्येकवेळी नाही म्हटल्यावर त्याचा राग सातव्या आसमानावर पोहोचायचा. मला वाटतं त्याला ‘नाही’ हा शब्द नापसंत होता.
हायेकनुसार, जेव्हा वाइंस्टीन त्याचा ड्रिम प्रोजेक्ट ‘फ्रिडा’ प्रोड्यूस करत होता तेव्हा त्याने स्क्रिप्टच्या बाहेर जाऊन तिचा एका दुस-या महिलेसोबत सेक्स सीन टाकला होता. यात सलमाला फ्रन्टने न्यूड दिसायचे होते. हायेकने हाही आरोप केलाय की, वाइंस्टीनने तिला जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
सलमा सांगते की, वाइंस्टीनचं सांगणं मान्य करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता कारण प्रॉडक्शनच्या कामाला ५ आठवड्यांचा वेळ गेला होता. सलमाला एशले जूडसहीत त्याला लोकांची चिंता होती ज्यांना तिने या सिनेमात करण्यासाठी तयार केले होते.
काही दिवसांपूर्वी ऎश्वर्या रायची माजी मॅनेजेर सिमोन शिफिल्डने सुद्धा आरोप लावला होता की, वाइंस्टीने ऎश्वर्याला एकट्यात भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण सिमोनने असे करण्यास नकार दिला होता.