close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

सिद्धार्थ मल्होत्राच्या ट्विटर अकाऊंटचं रहस्य...

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचं ट्विटर अकाऊंट सध्या रहस्य बनलंय. 

Updated: Dec 14, 2017, 07:52 PM IST
सिद्धार्थ मल्होत्राच्या ट्विटर अकाऊंटचं रहस्य...

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचं ट्विटर अकाऊंट सध्या रहस्य बनलंय. 

सोनू निगमनंतर सिद्धार्थ मल्होत्राही ट्विटरला रामराम ठोकणार का? आणि याचं उत्तर 'हो' असंल तर का? असे प्रश्न आता त्याच्या चाहत्यांना पडलेत. 

सिद्धार्थनं गुरुवारी केवळ चार शब्दांचं एक ट्विट केलंय. 'सॉरी आय अॅम डन' असं त्यानं आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये म्हटलंय. 

इतकंच नाही तर त्यानं आपला प्रोफाईल फोटो आणि कव्हर फोटोही सोशल मीडियावरून हटवलाय. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरचेही आपले फोटो हटवत त्यानं केवळ off असं लिहिलंय. 

सिद्धार्थनं असं का केलंय असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडलाय. काहींना हा सिद्धार्थच्या आगामी सिनेमाचा पब्लिसिटी स्टंट असल्याचं वाटतंय. 

येत्या महिन्यात सिद्धार्थचा नीरज पांडेय दिग्दर्शित 'अय्यारी' हा सिनेमा प्रदर्शित होतोय. या सिनेमात त्याच्यासोबत दिसणारी अभिनेत्री राकुल प्रीत सिंह हिनं सिद्धार्थच्या हे रहस्यमयी ट्विट रिट्विट करत केलेल्या ट्विटमुळे हा पब्लिसिटी स्टंट असल्याचंच दिसून येतंय.