दोन वर्षाच्या मुलीसोबत अभिनेत्रीचं संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे.    

Updated: Apr 20, 2021, 08:28 AM IST
दोन वर्षाच्या मुलीसोबत अभिनेत्रीचं संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात

मुंबई  : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. अभिनेता निल नितीन मुकेशच्या पाठोपाठ आता अभिनेत्री समीरा रेड्डीचं (Sameera Reddy) संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. सोमवारी समीरा आणि पती अक्षय वर्दे सोबतच्या त्यांच्या दोन मुलांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द समीराने संपूर्ण कुटुंबाला कोरोना झाल्याची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. सर्वात आधी समीराचा मोठा मुलगा हंसमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आली. 

हंसला ताप, थकवा, अंग दुखी अशी लक्षण आढळून आली. सलग चार दिवस त्याला त्रास होत असल्यामुळे हंसची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यानंतर समीराची दोन वर्षांची मुलगी न्याराला देखील कोरोनाची लागण झाली. समीराने दोन्ही मुलांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत संपूर्ण कुंटुंबाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sameera Reddy (@reddysameera)

समीरा म्हणते, 'मला मान्य करावं लागेल की सुरूवातीला मला घाबरायला झालं. करणा आपल्याला वाटतं आपण पूर्णपणे तयार आहोत. पण अशा परिस्थितीसाठी आपण कधीच तयार नसतो....' हंसनंतर न्यारा, समीरा आणि अक्षयला कोरोनाची लागण झाली. पुढे समीरा म्हणते, 'देवाची कृपा म्हणून माझ्या सासूला व्हायरसची लागण झाली नाही. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.' समीराचं कुटुंब आता योग्य उपचार घेत कोरोना नियमांचं पालन करत आहेत.