बायफ्रेंडकडून कानशिलात अन् KL Rahul सोबत अफेअर, 'त्या' वादग्रस्त अभिनेत्रीची आजही चर्चा

K L Rahul Ex-Girlfriend: बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात सेलिब्रेटींच्या लव्ह अफेअरची (Love Affair) चर्चा सुरू असते. त्यामुळे हे सेलिब्रेटी हे कायमच चर्चेत असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीची सर्वत्र चर्चा आहे. बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांना चित्रपटातून चांगले यश मिळते तर त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात (Personal Life) अनेक खाचखळगे खावे लागतात. 

Updated: Jan 17, 2023, 08:25 PM IST
बायफ्रेंडकडून कानशिलात अन् KL Rahul सोबत अफेअर, 'त्या' वादग्रस्त अभिनेत्रीची आजही चर्चा title=

K L Rahul Ex-Girlfriend: बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या प्रमाणात सेलिब्रेटींच्या लव्ह अफेअरची (Love Affair) चर्चा सुरू असते. त्यामुळे हे सेलिब्रेटी हे कायमच चर्चेत असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीची सर्वत्र चर्चा आहे. बॉलिवूडच्या मोठ्या कलाकारांना चित्रपटातून चांगले यश मिळते तर त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात (Personal Life) अनेक खाचखळगे खावे लागतात. तर काही सेलिब्रेटी हे आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये आणि पर्सनल लाईफमध्ये चांगला बॅलन्स साधू शकतात आणि ते त्यातही यशस्वी होतात. परंतु या अभिनेत्रीच्या आयुष्यात मात्र अनेकदा खाच खळगे आहे. (actress sonal chauhan who has acted in film jannat goes viral on social media)

परंतु इंटरनेटवर मात्र या अभिनेत्रीची जोरात चर्चा आहे. या अभिनेत्रीनं इमरान हाश्मीसोबत रॉमेण्टिक (Kissing Scenes) आणि किसिंग सीन्स दिले आहेत. काही वर्षांपुर्वी बॉयफ्रेंडकडून कानशिलात खाल्ली असल्याच्या बातम्यांना वेग आला होता. जाणून घेऊया अभिनेत्रीबद्दल! 

या अभिनेत्रीचं नावं आहे सोनल चौहान. 2008 साली जन्नत (Jannat) या चित्रपटातून तिनं काम केले होते. यावेळी तिच्या बोल्डनेसची खूप जास्त चर्चा झाली होती. इमरान हाश्मीसोबच्या किसिंग सीनमुळेही ती खूप चर्चेत आली होती. तिच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर मात्र ती फारशी बॉलिवूड चित्रपटांमधून दिसली नाही. सोनाली चौहान ही सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय आहे. तिचे इन्टाग्रामवरही लाखो फोलोवर्स आहेत. परंतु वयाच्या 35 व्या वर्षीही सोनल तितकीच ग्लॅमरस दिसते. 

सध्या तिच्या काही फोटोंनी सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. तिचे बिकीनीतले (Bikini) फोटोही सोशल मीडियावर चांगले व्हायरल होत असतात. एकेकाळी तिचे नावं हे क्रिकेटर के.एल राहूलशी जोडले गेले होते. त्यातून यावरूनही खूप चर्चा सुरू झाल्या होत्या तर दुसरीकडे आपल्या एक्स-बॉयफ्रेंडकडून कानशिलातही खाण्याचा प्रसंग अभिनेत्रीच्या आयुष्यात घडला होता. त्यामुळे या बातमीनं सगळीकडेच खळबळ माजली होती. परंतु ती के.एल.राहूलला डेट करत नसल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

यानंतर ती हिंदी चित्रपटसृष्टीत फार कमी वेळा दिसले होते. त्यातून तिच्या अभिनयाचेही कौतुक केले जाते. तिचे सोशल मीडियावर 52 लाख फॉलोवर्स आहेत. त्यातून चित्रपटातून फारसे यश मिळाले नसले तरी या अभिनेत्रीची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. ती अनेकदा आपले वेकेशन आणि आऊटडोअर (Sonal Chauhan Hot Photos) फोटो शेअर करत असते. सध्या अशाच काही तिच्या फोटोंची चर्चा आहे. त्यामुळे सोनल चौहान हे नावं खूप लोकप्रिय ठरले आहे. या अभिनेत्रीला सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर म्हणूनही ओळखले गेले आहे.