Virat Kohli च्या प्रामाणिकपणावर अनुष्का शर्माचं म्हणणं तरी काय? पाहा पोस्ट

पडत्या काळातून स्वत:ला ....

Updated: Nov 5, 2021, 03:39 PM IST
Virat Kohli च्या प्रामाणिकपणावर अनुष्का शर्माचं म्हणणं तरी काय? पाहा पोस्ट  title=
अनुष्का शर्मा, विराट कोहली

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनं कायमच पती विराट कोहली याला प्रत्येक प्रसंगात साथ दिली आहे. विराटच्या यशात ती त्याच्यासोबत होती, तर पडत्या काळात तिनं त्याला विश्वास, दिलासा दिला. जीवनात आपल्या जोडीदारासाठी वाटेल ते करणारी अनुष्का सध्या त्याच्या प्रामाणिकपणाबाबत असं काही म्हणून गेली आहे की सर्वांच्याच नजरा वळत आहेत.

विराटच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिनं एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये तिनं विराटसोबतचा एक सुरेख फोटो शेअर केला आहे. फोटोच्या कॅप्शनमधून तिनं विराटप्रती आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.

‘या फोटोला कोणत्याही फिल्टरची गरज नाही, त्याचप्रमाणे तुझ्या जगण्याच्या बाबतीतही आहे. तुझं अंतर्मन प्रामाणिकपणा आणि मोठ्या धाडसाचं आहे. मला ठाऊक आहे की पडत्या काळातून स्वत:ला बाहेर काढण्याचं जे धाडस तू दाखवतोस ते कोणालाही जमणार नाही. तू सर्वांगाने दिवसागणि आणखी चांगलाच होत चालला आहेस. कारण कोणतीही गोष्ट तू मनात साठवून ठेवत नाहीस. मला ठाऊक आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांविषयी बोलणाऱ्यांपैकी आपण नाही. पण, कधीकधी मला जोरात ओरडून सांगावंसं वाटतं की, तू किती अद्भूत आहेस. नशीबवान तेच आहेत जे खरंच तुला चांगलं ओळखतात. सर्वकाही खुप सुरेख करण्यासाठी, प्रकाशमान करण्यासाठी धन्यवाद. वाढदिवसाच्या शुभेच्छा...’, असं अनुष्काने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं.

पतीला कायमच साथ देणाऱ्यांपैकी एक असणाऱ्या अनुष्कानं तिच्या या भावना ज्या आर्ततेने व्यक्त केल्या ते पाहता प्रत्येक शब्द मनात घर करुन जात आहे असं म्हणणं अतिशोक्ती ठरणार नाही.