मुंबई : मराठी सिनेसृष्टीमध्ये बालकलाकार म्हणून एंट्री करून दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकणारा अभिनेता म्हणजे आदिनाथ कोठारे! आदिनाथने आजवर सिनेकरियरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. आदिनाथ कोठारे कायमच सोशल मीडियावर आपल्या अभिनयासोबतच फॅशनमुळेही तो चर्चेत असतो. आदिनाथचा नुकताच प्रदर्शित झालेल्या "शक्तीमान " चित्रपटात दिसला होता आता त्याने चाहत्यांना अजून एका नव्या प्रोजेक्ट ची माहिती त्याचा सोशल मीडिया वरून दिली आहे.
सध्या मराठी सोबतीने हिंदी इंडस्ट्री गाजवणारा आदिनाथ कोठारे लवकरच अजून एका हिंदी प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहे. आता हा हिंदी प्रोजेक्ट काय हा प्रश्न तुम्हाला पडला असणारच तर आदिनाथ हंसल मेहता दिग्दर्शित " गांधी " या वेब सीरिज मध्ये झळकणार असल्याचं कळतंय. येणाऱ्या काळात तो अनेक नवनवीन भूमिका देखील साकारणार आहे आणि अनेक कमालीच्या चित्रपटात दिसणार आहे. " झपाटलेला 3" आणि आता " गांधी " असे अनेक उत्तोत्तम प्रोजेक्ट्स तो या वर्षात करणार असून " गांधी " मध्ये नेमकी तो काय भूमिका साकारणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. इंग्लंड मध्ये तो गांधी च शूट करतोय आणि इथल्या अनेक स्टोरी त्याने त्याचा सोशल मीडिया वर शेयर केल्या आहेत.
आदिनाथ हा कायम चर्चेत असलेला अभिनेता तर आहेच पण एक दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता, लेखक अश्या अनेक बहुआयामी व्यक्तिरेखा तो साकारत आहे. आदिनाथ चे हे प्रोजेक्ट्स केव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे अद्याप गुलस्त्यातच आहेत.
आदिनाथ कोठारे हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नावं म्हणून ओळखले जाते. आदिनाथने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तो केवळ एक अभिनेता नव्हे तर दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही घराघरात प्रसिद्ध आहे. आदिनाथ कोठारेने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कपिल देव यांच्यावर आधारित ‘८३’ चित्रपटात आदिनाथने क्रिकेटपटू दिलीप वेंगसकर यांची भूमिका साकारली होती. मराठी सिनेसृष्टीतील एक नामवंत कुटुंब म्हणून कोठारे कुटुंबाची ओळख आहे. सध्याच्या घडीला छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांची निर्मिती कोठारे व्हिजन्सने केली आहे., ‘सुखं म्हणजे नक्की काय असतं’, ‘आई’, ‘माझी माणसं’ अशा कोठारे व्हिजन्सच्या अनेक मालिका घराघरांत लोकप्रिय ठरल्या आहेत.