मॉलच्या बाहेर गिटार वाजवताना दिसला अभिनेता, पाहून लोकं झाले हैराण

अभिनेत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Updated: Oct 30, 2021, 05:29 PM IST
मॉलच्या बाहेर गिटार वाजवताना दिसला अभिनेता, पाहून लोकं झाले हैराण title=

मुंबई : आदित्य रॉय कपूर हा एक असा अभिनेता आहे. ज्याच्या अभिनयाचं प्रत्येकवेळी कौतुक केलं जातं. त्याच्या कारकिर्दीतील सगळ्यात अविस्मणीय आणि यशस्वी चित्रपट 'आशिकी 2' होता आणि या चित्रपटाचं यशामुळे आजही त्याला राहुल जयकर म्हणून ओळखलं जातं. नुकताच आदित्य मॉलच्या बाहेर गाणं गाताना दिसला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आदित्य रॉय कपूरचा नवा लूक
बॉलीवूड अभिनेता आदित्य रॉय कपूरने त्याचा पहिला चित्रपट 'आशिकी 2' मध्ये गायकाची भूमिका साकारली होती पण आदित्य खऱ्या आयुष्यात खूप छान गातो हे त्याच्या चाहत्यांना कदाचित माहीत नसेल. आदित्यमधील गायक अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान दिसला होता. जेव्हा आदित्यने 'आशिकी 2' मधील त्याच्या व्यक्तिरेखेप्रमाणेच हातात गिटार धरला होता. तेव्हाच त्याने त्याच्या गाण्याला असा टच दिला की सर्वजण बघतच राहिले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

चाहत्यांना राहुल जयकर आठवला
आदित्य रॉय कपूरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप बघायला मिळत आहे. आदित्यचा हा व्हिडिओ फिल्मफेअरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आदित्य दिल्लीतील एका कार्यक्रमात पोहोचला आहे जिथे तो गिटारसोबत त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहोचतो आणि त्याच्या गायनाने थक्क करतो. 

व्हिडिओमध्ये त्याचे चाहते त्याला जल्लोष करताना दिसत आहेत. चाहत्यांना त्याचे गाणं इतकं आवडलं आहे की, ते त्याचा पुरेपूर आनंद घेत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांना आदित्य, त्याच्या 'आशिकी 2' चित्रपटातील राहुल जयकरची आठवण झाली. कोणत्याही रॉकस्टारप्रमाणे आदित्य हातात गिटार घेऊन इंग्रजी गाणं म्हणत आहे.