झिंगाटचं आफ्रिकन व्हर्जन होतय व्हायरल

गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळेंच्या 'सैराट'ने सगळीकडे धुमाकूळ घातला. अनेक भाषांमध्ये त्याचे रिमेकही येऊ लागले. त्यातील झिंगाट गाण्यावर तरुणांई थिरकली. पण आज एका वर्षानंतरही या गाण्याची क्रेझ काही कमी झाली नाही.  

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 18, 2017, 07:54 PM IST
झिंगाटचं आफ्रिकन व्हर्जन होतय व्हायरल title=

मुंबई: गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळेंच्या 'सैराट'ने सगळीकडे धुमाकूळ घातला. अनेक भाषांमध्ये त्याचे रिमेकही येऊ लागले. त्यातील झिंगाट गाण्यावर तरुणांई थिरकली. पण आज एका वर्षानंतरही या गाण्याची क्रेझ काही कमी झाली नाही.  

हे अजय-अतुलने संगीतबद्ध आणि स्वरबद्ध केलेल्या ‘झिंग झिंग झिंग झिंगाट…’ गाणे सातासमुद्रापार पोहोचले आहे. सॅम्युअल नावाच्या आफ्रिकन मुलाने ‘झिंगाट’ हे गाणं स्वत:च्या स्टाईलमध्ये गायल आहे. हे गाण सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अजय-अतुल यांना देखील हे झिंगाटच आफ्रिकन वर्जन आवडल आहे.