8 महिन्यांनंतर इरफान खान मुंबई एअरपोर्टवर स्पॉट

इरफान खान लवकरच 'हिंदी मीडियम 2' सिनेमात झळकणार आहे. 

Updated: Mar 9, 2019, 04:11 PM IST
8 महिन्यांनंतर इरफान खान मुंबई एअरपोर्टवर स्पॉट title=

मुंबई : आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये वर्चस्व गाजवणारा अभिनेता इरफान खानला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले आहे. कॅमेरापासून लपण्यासाठी त्याने तोंडावर रूमाल बांधले होते. पण सांगण्यात येत आहेत की त्याच्या हालचालींवरून तो इरफान असल्याचे स्पष्ट झाले. इरफान खान त्याच्या उपचारासाठी नेहमी देशाबाहेर असायचे. पण आता त्यांच्या तब्यतीत सुधारणा झाल्याचे दिसून येत आहे. कर्करोगाने ग्रस्त असलेल्या इमरान खानला सतत लंडनमध्ये जावे लागत असतं. 

इरफान खानची परिस्थिती स्थिर असल्याची चर्चा मगील काही दिवसांपासून रंगत होती. लवकरच इरफान त्याची खुशाली अधिकृतरित्या चाहत्यांसोबत शेअर करणार आहे. मागील 8 महिन्यांपासून इरफान लंडनमध्ये आपल्या आजारावर उपचार घेत होता. मुंबईत परतल्यानंतर 3 महिन्यांनंतर मुंबई एअरपोर्टवर इरफानला स्पॉट करण्यात आले. 

याआधी जून महिन्यात इरफानने एका पत्राद्वारे चाहत्यांसोबत संवाद साधला होता. मागील वर्षी दिवाळी सणाचे औचित्य साधत इरफान भारतात आला होता. आपल्या कुटुंबाला भेटून ते पुन्हा लंडन उपचारासाठी गेले. 

लवकरच इरफान खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. इरफान खान लवकरच 'हिंदी मीडियम 2' सिनेमात झळकणार आहेत. सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माते तिगमांशु धूलिया यांनी सिनेमाची अधिकृत घोषणा केली. सध्या सिनेमाच्या कथेवर काम चालू  आहे. 2018 मध्ये इरफानचा 'कारवां' सिनेमा प्रदर्शित झाला होता.